Categories
आव्हान ज्योतिष

ज्योतिषांनो, खालील प्रश्नांची उत्तरे द्या आणि 21 लाख मिळवा!

मे - २०१९

ज्योतिष आव्हान प्रक्रिया प्रश्नावली

प्रत्येक योग्य उत्तराला एक गुण आहे. प्रश्नावली एकूण गुण 25

प्रश्न क्र. 1. ‘लोकसभा 2019’ च्या निवडणुकीमध्ये खालील पक्षांना मिळणार्‍या एकूण जागा किती असतील? (कोणतेही पाच सोडवा, पाच गुण)

अ. बहुजन समाज पार्टी :

ब. भारतीय जनता पार्टी :

क. समाजवादी पार्टी :

ड. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस :

इ. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस :

ई. आम आदमी पार्टी :

उ. शिवसेना :

प्रश्न क्र. 2. ‘लोकसभा 2019’ च्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघातील एकूण झालेल्या मतदानाच्या किती टक्के मते मिळतील? (कोणतेही पाच सोडवा, पाच गुण)

अ. नरेंद्र मोदी :

ब. कन्हैया कुमार :

क. राहुल गांधी :

ड. असदुद्दिन ओवैसी :

इ. अमित शहा :

ई. राजू शेट्टी :

उ. फारूख अब्दुल्ला :

प्रश्न क्र. 3 : ‘लोकसभा 2019’ च्या निवडणुकीमध्ये खालील मतदारसंघातून विजयी होणार्‍या उमेदवाराचे नाव काय असेल? (कोणतेही पाच सोडवा, पाच गुण)

अ. उत्तर मुंबई :

ब. जम्मू :

क. फैजाबाद :

ड. बेहरमपूर (ओडीसा) :

इ. विशाखापट्टणम :

ई. कानपूर :

उ. मोरादाबाद :

प्रश्न क्र. 4. ‘लोकसभा 2019’ च्या निवडणुकीमध्ये खालील मतदारसंघात ‘नोटा’ (छेपश ेष ढहश अर्लेींश) या पर्यायासाठी मिळालेल्या मतांची संख्या किती असेल (कोणतेही पाच सोडवा, पाच गुण)

अ. रायबरेली :

ब. पुणे :

क. मथुरा :

ड. तिरुअनंतपूरम :

ई. तुमकूर :

उ. भोपाळ :

प्रश्न क्र. 5. खालीलपैकी कोणतेही पाच प्रश्न सोडवा (पाच गुण)

अ. ‘लोकसभा 2019’ च्या निवडणुकीमध्ये सर्वांत जास्त मताधिक्याने निवडून येणार्‍या महिला उमेदवाराचे नाव काय असेल? …………………………………

ब. लोकसभा 2019 च्या निवडणुकीमध्ये निवडून येणार्‍या महिला उमेदवारांची संख्या किती असेल? …………………………………

क. उत्तरप्रदेश राज्यात, ‘लोकसभा 2019’ च्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांच्या संख्येमध्ये कोणता पक्ष सर्वोच्च स्थानी असेल? ………………………………..

ड. ‘लोकसभा 2019’ च्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांच्या संख्येमध्ये कोणता पक्ष तिसर्‍या क्रमांकावर असेल? ……………………………………..

इ. लोकसभा 2019 च्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या किती असेल? : ………………………………………………..

ई. ‘लोकसभा 2019’ च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळणार्‍या मतांची टक्केवारी किती असेल? : ………………………………………………

उ. ‘लोकसभा 2019’ च्या निवडणुकीमध्ये सर्वांत जास्त मताधिक्याने निवडून येणार्‍या उमेदवाराचे नाव काय असेल? : ……………………………………………….

प्रश्नावली सादर करणार्‍याचे नाव : ……………………

पत्ता : …………………………………………..

…………………………………………..

मो.नं. : ……………………………………

ई-मेल : …………………………………….

प्रश्नावली सादर करणार्‍याची स्वाक्षरी : ………………..

20ज्योतिष आव्हान प्रक्रिया नियम व अटी

1. प्रवेशिका, उत्तराहित अधिकृत प्रश्नावली आणि ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र’ या नावे काढलेला रुपये 1,000 (रुपये एक हजार) प्रवेशशुल्काचा धनाकर्ष (डी.डी.) सीलबंद पाकिटातून दि. 20 मे 2019 पर्यंत रजिस्टर पोस्टाने खालील पत्त्यावर मिळणे बंधनकारक आहे.

पत्ता : डॉ. नितीन शिंदे, ‘कल्पतरू’ कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजसमोर, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली (महाराष्ट्र) 415409. मोबा. 9860438208,

ईमेल : nsshinde66@gmail.com

2. प्रवेशिका, प्रश्नावली आरि नियमावलीसाठी डॉ. नितीन शिंदे यांचेशी संपर्क करावा.

3. प्रवेशिका आणि प्रश्नावलीमधील माहिती स्वत:च्या हस्ताक्षरामध्ये अथवा टाईप केलेली असावी.

4. आव्हान प्रक्रियेसाठी निर्णय अधिकारी म्हणून ‘परीक्षक समिती’ कार्यरत असेल. परीक्षक समितीचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.

5. ज्योतिष आव्हान प्रक्रियेसाठीच्या बक्षिसाची रक्कम रुपये एकवीस लाख असेल.

6. एका व्यक्तीची एकच प्रवेशिका स्पर्धेसाठी पात्र असेल.

7. प्रश्नावली पंचवीस गुणांची असेल. प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तराला एक गुण असेल.

8. संख्यात्मक अथवा टक्केवारीतील प्रश्नांसाठीच्या उत्तरातील पाच टक्के फरक हा स्वीकारार्ह राहील.

9. संख्यात्मक अथवा टक्केवारीतील प्रश्नांसाठीच्या उत्तरामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक संख्या असतील, तर आपले उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही. उदा. एखाद्या पक्षाला 100 ते 120 जागा मिळतील, असे न लिहिता, अचूक आकडा 110 असा लिहिलेला असावा.

10. निवडणुकीचे भविष्य वर्तवण्यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य सहभागी प्रवेशकर्त्याने स्वत: उपलब्ध करावयाचे आहे.

11. पंचवीस गुण मिळवणारा स्पर्धक बक्षीसपात्र असेल.

12.आव्हान प्रक्रियेच्या संबंधातील आक्षेप, वाद व हरकतींचे न्यायालयीन कामकाज सांगली, ता. मिरज, जि. सांगलीच्या न्यायालयाच्या कार्यकक्षेत असेल.

13. उमेदवार दोन मतदारसंघातून निवडणूक लढवित असल्यास उत्तर कोणत्या मतदारसंघाशी संबंधित आहे ते उमेदवाराच्या नावापुढे नमूद करावे; अन्यथा आपली प्रश्नावली बाद ठरवण्यात येईल.

14. या प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील निवडणूक निकाल आणि आकडेवारी ग्राह्य धरण्यात येईल.

15. भविष्य वर्तवण्यासाठी कोणती पद्धत वापरली, हे प्रवेशिकेत नमूद करणे आवश्यक आहे; अन्यथा आपली प्रश्नावली ग्राह्य धरण्यात येणार नाही.

16. निवडणूक आयोगाने अधिकृतपणे सर्व निकाल त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केल्यानंतर एक आठवड्याच्या आत परीक्षक समितीच्या योग्य त्या तपासणीनंतर आव्हान प्रक्रियेचा अधिकृत निकाल जाहीर करण्यात येईल.

ज्योतिष आव्हान प्रक्रिया प्रवेशिका

1. नाव :

2. आधार कार्ड नंबर :

3. संपर्कासाठी पत्ता :

ता. जि. पिन कोड

भ्रमणध्वनी ई-मेल :

4. शिक्षण :

5. भविष्य वर्तवण्याचा अनुभव

6. भविष्य वर्तवण्यासाठी आधाराला कोणती पद्धत वापरली : पत्रिका पाहून/अंत:प्रेरणा/दैवी शक्ती/ रेकी/हस्तरेषा/भविष्याच्या इतर पद्धती.

7. धनाकर्ष (डीडी) रक्कम रु.

धनाकर्ष (डीडी) क्रमांक

बँकेचे नाव

प्रवेशिका सादर करणार्‍याची स्वाक्षरी :

दिनांक : ठिकाण :

स्वाक्षरी

हमीपत्र

मी, अशी हमी देतो की, मी स्वेच्छेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकसभा निवडणूक 2019 : ज्योतिष आव्हान प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ इच्छितो. या प्रक्रियेचे सर्व नियम व अटी मला मान्य आहेत. प्रवेश शुल्क म्हणून भरलेले रु. 1,000 (रुपये एक हजार) रक्कम परत मिळणार नाही, हे मला मान्य आहे. या अभियानाच्या परीक्षक समितीचा निर्णय मला मान्य आहे. तसेच यासाठीची कोणतीही न्यायालयीन प्रक्रिया सांगली, ता. मिरज, जि. सांगली येथील न्यायालयीन कार्यक्षेत्रात चालेल, हे मला मान्य आहे.

——–

स्वाक्षरी

दिनांक :

ठिकाण :