कर्जत येथील जोगेश्वरवाडीतील 13 वर्षे वयाच्या धनराज (विशाल) दत्तात्रय वीर हा दैवी चमत्काराचा दावा करून भोंदूगिरी करत होता. अंनिसकडे आलेल्या तक्रारीवरून अंनिसचे कार्यकर्ते अॅड.रंजना पगार-गवांदे व कृष्णा चांदगुडे यांनी बाबाच्या दरबारात जाऊन पर्दाफाश केला. कर्जत जवळील जोगेश्वरवाडी येथे धनराज वीर हा इयत्ता 7 वीतील अल्पवयीन मुलगा मला दैवीशक्तीचा आदेश आहे म्हणून मी शिक्षण सोडावे, […]
कॅटेगरी: इतर
शुक्राचं चांदणं? शनिची अवकृपा?
‘शुक्राचं चांदणं लेऊन 3 एप्रिलची सायंकाळ येईल. पश्चिम क्षितिजावर शुक्राचं दर्शन घडेलच. आठवड्यानंतर 15 एप्रिल शनिमहाराज गाजवतील. रात्रभर शनिदर्शन होईल.’ अशा आशयाची बातमी दै.सकाळच्या पहिल्या पानावर होती. बातमी फारशी अतिरंजीत नाही. परंतु त्यातून व्यक्त होणारा आशय चुकीचा संदेश देण्याची शक्यता आहे. सध्या शुक्र दिवस मावळल्यानंतर पश्चिम क्षितिजावर अत्यंत तेजस्वी चांदणीच्या रूपात आपलं लक्ष […]
अंनिसचे जिल्हा मेळावे -आश्वासक अनुभव
यावर्षी प्रथमच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत जिल्हा प्रेरणा संकल्प मेळावे घेत आहे. आतापर्यंत रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा असे चार जिल्हा मेळावे संपन्न झाले आहेत. हा अंक वाचकांच्या हाती पडेपर्यंत आणखी पाच जिल्ह्यांचे मेळावे झाले असतील. आणि मे अखेर सर्व जिल्ह्यांतील मेळावे झाले असतील. या कल्पनेचे यश बघता ती आधीच का सुचली […]
श्रावण सुरु झाल्यापासून व्रत, वैकल्ये, सण, उत्सवांचा मोसम सुरु झाला आहे. आता पुढचे 6-7 महिने सलगपणे कुठला ना कुठला सण-उत्सव-व्रत असणार आहे, दिवसेंदिवस त्यामध्ये भरच पडतांना आपण बघतो. त्याच्याशी संबंधित अनेक घटकांचे पोटपाणी त्यावर अवलंबून आहे हे पण आपल्याला माहित आहे. पूजा विधीला लागणार्या साहित्यापासून पुजा सांगणार्या पुजार्यापर्यंत आणि वर्गणी जमविणार्या मित्र मंडळ कार्यकर्त्यांपासून मंडप, […]
धर्मद्रोही हे राष्ट्रद्रोहीसुद्धा ऑगस्ट 2011 च्या अं.नि.वा.मध्ये ‘खरे धर्मद्रोही’ अग्रलेखात म्हटले आहे की, धर्माची ठेकेदार मंडळीच खरी धर्मद्रोही आहेत. मला तरी ही ठेकेदार मंडळी नुसती धर्मद्रोही वाटत नाहीत तर देशद्रोही वाटतात. कारण ज्या कायद्यानुसार भारताचा कारभार चालतो तो कायदा म्हणजे ‘भारताचे संविधान’ त्यात स्पष्टपणे सांगितले की, ‘भारतातील प्रत्येक नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, शोधकबुद्धी व […]
भिंगेवाडी(ता.आटपाडी, जि.सांगली) येथे रूग्णावर अघोरी औषधोपचार करणार्या तिघाजणांना पकडण्यात अं.नि.स.च्या कार्यकर्त्यांना यश आले आहे. भिंगेवाडी येथे दर शनिवार व रविवारी अनेक व्याधींवर पावडरचा वापर करून लोकांवर अघोरी उपचार करण्याचे काम भोंदू वैद्य याशीम इमाम शेख(वय 69), त्यांची दोन मुले नजीर(वय 40), करीम (वय 29) गेल्या अनेक वर्षांपासून करीत होते. गेली 20-25 वर्षे शेख कुटुंबिय […]
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय काम करते हे आता उभ्या महाराष्ट्राला पक्के माहीत आहे. त्याची योग्य नोंद महाराष्ट्राच्या मानसिकतेने व माध्यमाने घेतली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या या संघर्षाबरोबर कळत नकळत धर्म चिकित्साही येते. त्याचे रागलोभ समितीला चिकटतात. त्याहीबाबत वाचकांना थोडीबहुत जाणीव आहे. पण या दोन्हीबरोबरच एक तिसरे अंग संघटनेला आहे ते आहे. संविधानाच्या मूल्यजाणीवासह विज्ञान प्रसाराच्या […]
जाहिरातींमधील स्त्री-प्रतिमा
जागतिकीकरणाच्या या युगात टी.व्ही.वरून जाहिरातींचा असा काही भडीमार केला जात आहे की, त्यामुळे मानवी गरजा आणि मूल्यं यांचे अवमूल्यन झालं आहे. हे अवमूल्यन एवढ्या पातळीवर पोहचलं आहे की, मूल्यं आणि ग्राहकोपयोगी वस्तू यांच्यात अदलाबदल होऊ शकते. नवं रूप, सौंदर्य, मोहकपणा आणि कर्तृत्व यांच्या नावानं कृत्रिम गरजा निर्माण केल्या जातात. त्या पूर्ण झाल्या की, “कुणीही उजळ […]
किशोराचे पान…
1.कोपर्यातला आवाज आपल्यातील बहुतेकांना प्रकाश हा ध्वनीप्रमाणे तरंगांच्या स्वरूपात आहे, हे माहीत असावे. तरीसुद्धा प्रकाश व ध्वनी वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत असतात. उदाहरणार्थ, आपण कोपर्याच्या दुसर्या बाजूचा आवाज ऐकू शकतो. परंतु कोपर्याआडची वस्तू पाहू शकत नाही. याचे कारण काय? प्रकाश व ध्वनी हे दोन्ही तरंगाच्या स्वरूपात असले तरी त्यांच्या तरंगाच्या लांबीत फार मोठा […]