9 ऑगस्ट 1989 या ऑगस्ट क्रांतीदिनी अधिकृतपणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रीतसर काम सुरू झाले. या कामाला 9 ऑगस्ट 1914 रोजी पंचवीस वर्षे पूर्ण झाली. न्यायावर आधारीत अंधश्रद्धा मुक्त समाज साकार व्हावा हे ध्येय उराशी बाळगून डॉ.दाभोलकर आणि त्यांच्या मोजक्या ध्येयवेड्या मित्रांनी सुरू केलेल्या कामाचे आजचे समाज परिणामकारी रूप पाहताना मन थक्क होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या […]
टॅग: झुंजार पंचविशी
चळवळीला दिशा देणार्या विचारवंताची गरज
नव्या परिस्थितीत विचारांचा विकास होणे नेहमी गरजेचे असते आणि कुठल्याही चळवळीत ते काम होणे गरजेचे आहे. नाहीतर मग विचारांची एक पोथी बनते आणि ते वर्तमानातील आव्हानांकडे एक तर दुर्लक्ष करते किंवा त्याचे आकलन होत नाही. चळवळीला विचारांची दिशा देणारा, त्या विचारांवर आधारीत नवे नवे कार्यक्रम सुचवणारा, एक तत्ववेत्ता, एक भाष्यकार आणि कुशल संघटक सनातन्यांनी डॉक्टरांची […]
‘अंनिस’ ही ‘चळवळ’ म्हणून उभी राहू शकेल का?
अंनिसने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, बौद्धिक व नैतिक अशा क्षेत्रांतील आपली भूमिका स्विकारली तर निश्चितच तिचे चळवळीत रूपांतर होईल. अंधश्रद्धा निर्मूलन हा एका व्यापक भूमिकेचा भाग राहील. भारतामध्ये चळवळींचे, जनआंदोलनांचे फार महत्व आहे. जगात अनेक देशांमध्ये लोकशाही प्रणालीने राजकारण चालते. तथापि प्रत्येक देशाच्या लोकशाहीचा बंध वा पोत अलग अलग असतो. भारतामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीनी […]
भारतातील विवेकवादाची अपूर्ण क्रांती
केवळ अंधश्रद्धा विरोध आज पुरेसा नाही. जागतिकीकरणाच्या आजच्या संदर्भात एकीकडे विवेकवादाच्या सखोल तात्त्विक चर्चा घडवणे निकडीचे झाले आहे. म्हणजे नव्या कार्यकर्त्यांना अंधश्रद्धाविरोधाच्या प्रयोगापलीकडे जाऊन इहवाद, विवेकवाद, धार्मिकतेच्या अतिरेकाविरोधी कोणत्या प्रकारचा व काय विचार करायचा ते अधिक स्पष्ट होईल. त्याचबरोबर तरूण– तरूणींना आकर्षित करणार्या नव्या भाषेत, नव्या साधनांनिशी विवेकवादी संवाद अनेकपटींनी वाढेल कसा, हे महत्त्वाचे. काही […]
20ऑगस्ट 2013रोजी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची निर्घृण हत्या झाली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला, देश हलला आणि जगभर त्याचे तरंग उडले. या घटनेला आता जवळपास 15महिने होत आले आहेत. या घटनेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मोडून पडली नाही. कार्यकर्ते खचले नाहीत. संघटना पूर्वी इतकीच किंबहुना जास्त उपक्रमशील राहिली. हे सार्या महाराष्ट्राने गेल्या वर्षभरात अनुभवले आहे. समितीचे […]
अभिनव उपक्रमामुळेच संघटनेत जिवंतपणा!
अंधश्रद्धा निर्मूलनाच्यासाठी सातत्याने पंचवीस वर्षेसंघटीतपणे लढणारी, कृतीशील असणारी आणि याच कार्यात निर्घृणपणे खून होऊन नेता गमावणारी, तरीही त्याच तडफेने उभी असलेली म.अं.नि.स.ही एकमेव चळवळ आहे. शोषणमुक्त, निर्भय आणि नीतीमान समाजाच्या निर्मितीचं ध्येय उराशी बाळगत 35 जिल्ह्यांतील 250 शाखांमधून हे काम सुरू आहे. कोणत्याही शासकीय वा परदेशी अनुदानाशिवाय चालणारे हे जात धर्म निरपेक्ष मजबूत संघटन आहे. […]