Categories
अभिवादन

विवेकाचे झाड

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

ज्यांच्या कार्यकर्तृत्वावर त्यांच्या हयातीतच मला आदरपूर्वक गौरवाने लिहावयाचे होते, त्या माझ्या जिवलगाविषयी मरणोत्तर मला लिहावं लागेल, असं मला अंधुकसंही वाटलं नव्हतं. पण परवा ‘रक्षा’बंधनाच्या पहाटे डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केली माथेफिरूंनी. सर्वसाधारण स्वतःला उच्च विद्याविभूषित वगैरे समजणार्‍या मध्यम वर्गाला ‘अडाणी’ म्हणजे निरक्षर, कष्टकरी, वंचित, दारिद्य्रात जगणारा वर्ग ‘अंधश्रद्ध’ वगैरे वाटत असतो. पण त्यांच्या या तथाकथित […]

Categories
अभिवादन

पुरोगामी चळवळ मागे पडणार नाही.

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

नरेंद्र दाभोलकर एक समन्वयवादी, सर्वसमावेशक, एक चांगला कुशल संघटक, सहसा कुणाशी अतिरेकी पद्धतीने न वागणारा असा होता. त्याच्यावर अशा पद्धतीचा हल्ला झाला, हे समजल्यावर धक्का बसला. यामागे असा तर संदेश द्यायचा नाही ना, की पुरोगामी लोकांमधली सौम्य माणसेसुद्धा आम्हाला चालणार नाहीत. जो जो विरोध करेल त्याला आम्ही संपवू, असे वातावरण तयार होत आहे. नरेंद्र मोदी […]

Categories
अभिवादन

साध्या माणसाचा दुर्दैवी अंत

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

डॉ.नरेंद्र दाभोलकरांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्यातल्या त्यात पुण्यासारख्या विवेकी आणि विचारी शहर अशी ख्याती असलेल्या ठिकाणी त्यांची हत्या झाली याचं विशेष वैषम्य वाटतं. विचारानं विचाराचा प्रतिकार करावा. मात्र, सध्या हा विवेकच हरवताना दिसतो. नरेंद्र दाभोलकर अतिशय मनापासून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, आंतरजातीय विवाह, जादूटोणा विरोध आदी विषयांवर काम करत होते. शिवाय […]

Categories
अभिवादन

डॉक्टर आपल्यासाठी ‘शहीद’ झालेत, हे लक्षात ठेवूया!

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘जातपंचायत अडसर आणि कायदा’ यावर महाचर्चा होती. या चर्चेत भाग घेण्यासाठी मला निमंत्रण होतं. या महाचर्चेत नरेंद्र दाभोलकर सहभागी होणार होते. संपादक प्रदीप भिडे, सहयोगी वक्ते अ‍ॅड.भास्कर आव्हाड आणि मी, निर्माते जयू भाटकरांच्या केबिनमध्ये चहा घेत असतानाच डॉक्टर आले! तोच सुस्मित चेहरा, एक छोटेखानी बॅग… […]

Categories
अभिवादन

मोदीमय गुजरातेत गांधी कुठे शोधायचे?

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

तुम्ही गेल्यानंतर मी श्रद्धांजली सभेला गेलो नाहीमोर्च्यातही गेलो नाहीअपराधी भावनेने मन भरून आलंयतुमच्या 18 वर्षांच्या लढाईत मी काहीच का केलं नाही?समुद्राने पिल्लं नेलेल्या टिटवीच्या आकांताने तुम्ही ओरडताना मी समुद्राचे सौंदर्य बघत राहिलो कधी ना तुमच्या आंदोलनात आलो ः आंदोलनाच्या बाजूने लेख सोडाच साधे वाचकांचे पत्रही लिहिले नाहीफक्त तुम्ही भेटल्यावर हवापाण्याच्या गप्पा माराव्यात तशी विधेयकाची चौकशी […]

Categories
अभिवादन

सावधान, रात्र वैर्‍याची आहे

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

नरेंद्र दाभोलकर यांची हत्या हे अवघ्या महाराष्ट्राला एक लांच्छन आहे. अवघे आयुष्य व्रतस्थपणे जगणार्‍या, अंधश्रद्धा निर्मूलन हा ध्यास घेतलेल्या, सामाजिक न्याय, समता आणि बंधुत्व या विचारांनी प्रेरित होऊन त्या मूल्यांसाठी संघर्ष करणार्‍या एका ध्येयवादी माणसावरचा हा हिंस्त्र हल्ला म्हणजे देशात वाढत चाललेल्या सनातनी वृत्तीचा भीषण पुरावा आहे. ही हत्या म्हणजे तमाम सुसंस्कृतपणाची, आधुनिक व विज्ञानवादी […]

Categories
अभिवादन

उजेडावर घाला

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

कोट्यवधी जनतेच्या मनात वर्षानुवर्षे चिकटलेली अंधश्रद्धेची वटवाघुळं दूर करत तेथे ज्ञान, विज्ञान आणि विवेकाचा उजेड पसरवू पाहणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात भल्या सकाळी झालेली हत्या म्हणजे विवेकवादाला मोठा हादराच म्हणावा लागेल. रात्रंदिवस कष्ट उपसत, छोट्या-मोठ्या लढाया जाग्या करत दाभोलकरांनी चालवलेली अंधश्रद्धा विरोधी चळवळ विवेकवादाचे रूप धारण करत होती. देव, धर्म, रुढी, परंपरा यांच्या नावाने […]

Categories
अभिवादन

डॉ. दाभोलकरांचा लढा अविवेकीप्रवृत्ती विरोधात होता!

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३
Categories
अभिवादन

महाराष्ट्र पुन्हा शरमिंदा

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने जादूटोणा प्रतिबंधक विधेयकाचा वटहुकूम काढण्याचा निर्णय घेतला. लगेचच या विधेयकाला शिवसेनेचा विरोध असल्याचं जाहीर करण्यात आलं. आदल्या दिवशी दाभोलकर यांना आदरांजली वाहणार्‍या शिवसेनेनं लगेचच आपला मुखवटा काढून चेहरा दाखवावा, तसंच हे झालं. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विज्ञाननिष्ठ भूमिका घेऊन जादूटोणा प्रतिबंधक विधेयकाला संपूर्णपणे […]

Categories
अभिवादन

सूर्य पाहिलेला मी!

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रात शोकव्याकुळता आहे, संताप आहे. तुम्ही विचार करायला का घाबरता, असा रोकडा सवाल विचारणार्‍या आगरकरांचाही इथे खून नाही झाला. खून ना फुल्यांचा झाला, ना राजा राममोहन रॉय यांचा. अठराव्या, एकोणीसाव्या, विसाव्या शतकातील प्रतिगामी व्यवस्थेत जे घडले नाही, ते एकविसाव्या शतकात, लोकशाही व्यवस्थेत, ज्ञानाधारित समाजात घडावे! या संदर्भात चिंतन आणि आत्मपरीक्षणाची […]