Categories
अभिवादन

ही समाजाची हानी आहे

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

नरेंद्रचा खून होणं हे अतिशय दुर्दैवी आहे. नरेंद्र हा माझा खूप जवळचा मित्र होता. त्यामुळे त्याचं जाणं माझ्यासाठी वेदनादायी आहे. नरेंद्र करत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याबद्दल मला प्रचंड आदर होता. त्याच्या या कार्यात मी मला जितकी जमेल तितकी मदत करायचा प्रयत्न करायचो. त्यामुळे आमच्या भेटीगाठी नेहमीच व्हायच्या. आम्ही भेटलो की आमचे गप्पांचे फड रंगायचे. मी […]

Categories
अभिवादन

या दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

घडले ते फारच वाईट घडले. आमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडील हे सर्व आहे. डॉ.दाभोलकरांशी माझा 30 वर्षांपासूनचा परिचय होता. अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या कार्यक्रमानिमित्ताने आम्ही दीर्घकाळ संपर्कात होतो. त्यांना खरी आदरांजली म्हणजे त्यांचे कार्य पुढे नेणे. त्यामुळे आपल्यावर एका बाजूने ती जबाबदारी आहे. आणि दुसर्‍या बाजूने निर्धार पण आहे. आपण कार्यकर्त्यांनी त्या निर्धारावर अधिक भर दिला पाहिजे. जेव्हा […]

Categories
अभिवादन

एका संघर्षाची अखेर

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

चर्चेला कायम तयार असणार्‍या, अहिंसेचं तत्त्व मनोमन मानणार्‍या, समाजातील वाईटाचं निर्मूलन होऊन सर्वसामान्यांचं जीवन सुखी व्हावं असं वाटणार्‍या माणसाची अखेर ही महाराष्ट्रातील सुजाणांना चिंता वाटावी अशीच आहे. त्याचबरोबर, एरवी गुळगुळीत वाटणारा नेमस्त पण चिवट आणि ठाम मध्यमवर्ग प्रत्यक्षात हितसंबंधीयांना ‘थ्रेट’ वाटत असतो. हे सत्य पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन लागलं की आश्वासनांच्या […]

Categories
अभिवादन

विधायक विवेकाची विघातक हत्या

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

तुम्ही समाजसुधारणेचं, धर्मसुधारणेचं काम करणार असाल… समतेची, न्यायाची, विवेकनिष्ठतेची, वैज्ञानिक दृष्टिकोनाची भाषा बोलणार असाल… देवाधर्माच्या नावाने होणार्‍या शोषणाविरुद्ध भूमिका घेणार असाल, तर तुमचा नरेंद्र दाभोलकर होईल… डॉ. दाभोलकरांचे मारेकरी आज महाराष्ट्राला हाच इशारा देत आहेत. दाभोलकरांचे मारेकरी कोण? हे आजही अस्पष्ट आहे, पण ज्यांनी ही हत्या केली त्यांना विवेकनिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मचिकित्सा या गोष्टी मान्य […]

Categories
अभिवादन

पुढील पिढ्यांसाठी त्यांचे कार्य महत्त्वाचे

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाची बातमी कळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला आणि पुरोगामी, वैचारिक, वैज्ञानिक चळवळीवर विश्वास असणारे अवाक् झाले. वास्तविक डॉ. दाभोलकरांचा खून होईल, असे काही त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्हते. साने गुरुजी, गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. त्यांचे आंदोलन सनदशीर मार्गाने चालू होते. त्यांनी भडकविणारी भाषणे केली नाहीत. कोणत्याही धर्माच्या ते विरोधी नव्हते. इतकेच नव्हे ‘मी […]

Categories
अभिवादन

दाभोलकरांचा विचार संपणार नाही…

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून म्हणजे एका विवेकी माणसाची अविवेकी माणसांनी केलेली हत्या होय. दाभोलकरांचा मृत्यू झाला. म्हणजेच दाभोलकरांचा देह संपला, पण याचा अर्थ त्यांनी रुजवलेला विचार संपला असा नाही. मारणार्‍या व्यक्तीला वाटते की माणूस संपला की विचार संपला, पण मारणार्‍या व्यक्तीचे हे केविलवाणे अज्ञान असते. ज्यांना विचारांचा सामना विचारांनी करायचा नसतो, त्याच व्यक्ती ही […]

Categories
अभिवादन

महाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

चार दिवसांपूर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. “हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा?” अशी सुरवात करून बराच वेळ बोलत होते. बार्टीच्या वतीने (डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे) “महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन विचाराची वाटचाल” या विषयावरील पुस्तक ते संपादित करीत होते. त्यासाठी मी “सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक चळवळीचे अंधश्रद्धा निर्मूलनातील योगदान” हा लेख द्यायचे कबूल केलेले […]

Categories
अभिवादन

अक्षय ऊर्जा आणि अफाट कार्यक्षमतेचा खून

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

“विचार जेव्हा जनतेच्या मनाची पकड घेतात तेव्हा ते एक भौतिक शक्ती बनतात.” असे मार्क्स यांनी विचारांचे सामर्थ्य विषद केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी गेली चार दशके जो विवेकवादाचा, अंधश्रद्धा विरोधाचा विचार महाराष्ट्रात रूजवला, आणि त्यांच्या कुशल संघटन कौशल्यामुळे तो महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुका, जिल्ह्यात, गावागावात चढत्या श्रेणीत वाढत गेला. त्यातून वर म्हटल्याप्रमाणे जी एक […]

Categories
अभिवादन

कार्यकर्ता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

माझा आणि येथील कित्येक जेष्ठ कार्यकर्त्यांचा डॉ. दाभोलकरांशी 1988 ते 2013 या काळातला 25 वर्षांचा स्नेहबंध होता. डॉ. दाभोलकर हे आमच्यासाठी समाज कार्यकर्ता कसा असावा याचे उदाहरण होते. प्रचंड उरक, अमाप उत्साह, अपार कष्ट, प्रयत्नवादाचे मूर्तिमंत उदाहरण, सत्शील वर्तन, निष्कलंक चारित्त्र्य, समाजाची उत्तम जाण, समाजातील पीडितांच्या दुखा:बाबत कणव, जाणीव, सहवेदना, आयुष्य वाहून टाकणारा निरलस कार्यकर्ता […]

Categories
अभिवादन

कबड्डीपटू दाभोलकर

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

पुरोगामी विचारवंत, सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्ता, विशिष्ट ध्येय समोर ठेवून संपूर्ण आयुष्य वेचलेला कर्मयोगी अशी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची उभ्या महाराष्ट्राला ओळख आहे. पण त्याचवेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचा उत्कृष्ट कबड्डीपटू आणि क्रीडासंघटक म्हणूनही डॉ. दाभोलकर महाराष्ट्राला परिचित आहेत. डॉ. दाभोलकरांची क्रीडा क्षेत्रातील कारकीर्द सातारच्या शिवाजी उदय मंडळात गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली. वयाच्या 18 […]