Categories
आंदोलन

तीन खुनांच्या गतिमान तपासासाठी दिल्ली येथे ‘अंनिस’चे भव्य धरणे आंदोलन

मार्च - २०१६

शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा.डॉ.एम.एम.कलबुर्गी यांच्या निर्घृण खुनाला अनुक्रमे अडीच वर्षे, एक वर्ष आणि सहा महिने पूर्ण होत आहेत. मात्र अजूनही त्यांचे मारेकरी व सूत्रधार मोकाट आहेत. तपासाची गती अतिशय मंद आहे. त्यामुळे कार्यकर्तेआणि विवेकी सामान्य माणूस सतत अस्वस्थ आहे. तपास लवकर लागावा आणि सत्य काय आहे ते लोकांसमोर यावे यासाठी समितीने […]

Categories
आंदोलन

सरकारविरोधात ‘अंनिस’चा एल्गार

ऑगस्ट - २०१५

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकर्‍यांचा शोध लावण्याच्या प्रक्रियेमध्ये शासन हलगर्जीपणा करत आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास अतिशय संथपणे होत असल्याचा पुनरूच्चार ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने आझाद मैदान येथील राज्यव्यापी आंदोलनात पुन्हा केला. हे तपासकार्य कूर्मगतीने सुरू असून, या खुनामधील आरोपींना पकडण्याची सरकारची इच्छाशक्ती दिसत नसल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी यावेळी नोंदवली. डॉ.नरेंद्र दाभोलकर […]

Categories
आंदोलन संतविचार

कीर्तनातून उलगडला दाभोलकरांचा विवेकवाद

मार्च - २०१४

पुणे – कपाळी अष्टगंध, डोईवर केशरी पटका, हाती टाळ अन् मुखी लाडक्या विठोबाचे नाव… हरिनामाची पताका फडकवत मृदंगाच्या निनादावर जागर चालला होता… विवेकाचा, विचाराचा अन् संघर्षाचा. नोकरीवर जाण्याच्या गडबडीतही गुरुवारी सकाळी प्रत्येक जण थोडासा थबकत होता… उत्सुकतेने क्षणभरासाठी का होईना ऐकत होता. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला गुरुवारी सहा महिने पूर्ण झाल्याने पुरोगामी परंपरेची आठवण करून […]

Categories
आंदोलन

विवेकाचा आवाज बुलंद करू या!

जानेवारी - २०१४

2 डिसेंबरच्या मुंबईच्या मोर्चास उस्त्फुर्त प्रतिसाद जादूटोणा विरोधी कायदा मंजूर करून घेण्यासाठी महाराष्ट्र अंनिसने लोकशाहीतील सर्व सनदशीर मार्ग वापरले. अगदी धरणे, आंदोलने, मूक मोर्चा, निषेध मोर्चा, उपोषणे, पत्र लिहिणे, जिल्हाधिकार्‍यांना निवेदने देणे, स्वरक्ताने पत्रे लिहिली सगळं केलं. पण शासन काही मनावर घेईना. शेवटी ठरवून डॉ. दाभोलकरांना ‘कुणी तरी’ संपवलं. आणि शासनाला जाग आली. 20 ऑगस्टला […]

Categories
आंदोलन

जातपंचायतींच्या मनमानीविरोधात अंनिसचा एल्गार

ऑगस्ट - २०१३

दि.26 जून रोजी प्रमिलाचा वाढदिवस होता. आदल्या दिवशी भल्या पहाटे तिचे वडील तिच्या सासरच्या घरी गेले. प्रमिलाची आई आजारी असल्यामुळे भेटण्यासाठी प्रमिलाला त्यांनी सोबत घेतले. सोबत आणलेली रिक्षा दवाखान्याजवळ आल्यानंतर प्रमिलाच्या वडिलांनी रिक्षा चालकास दवाखान्यात पाठविले. आणि शांतपणे सोबत आणलेल्या दोरीने त्याने प्रमिलाचा गळा आवळला. जमलेल्या जमावाने प्रमिलास दवाखान्यात नेण्याअगोदरच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याला […]

Categories
आंदोलन वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्र्यांच्या विरोधात कोल्हापूर व इस्लामपुरात निदर्शने

एप्रिल - २०११

‘घर पाहावे बांधून’ अशी एक म्हण प्रचलित आहे. घर बांधताना काय काय करावं लागतं याचा अनुभव प्रत्येकजण घेत असतो. परंतु आजकाल आपण स्वत:साठी बांधलेले घर हे आपणास घातकी, अशुभ असू शकतं, घर घात करू शकतं ही संकल्पना(अंधश्रद्धा) सध्या काही मंडळी मुद्दामहून वाढवत आहेत. खरे तर ही संकल्पनाच विचित्र आणि हास्यास्पद आहे. तरीही आज याला ‘वास्तुशास्त्र’ […]