Categories
जात पंचायत

जात पंचायतीच्या/गावकीच्या मनमानी विरोधी कोकणस्तरीय एल्गार परिषद

मार्च - २०१५

जात हीच एक अंधश्रद्धा आहे आणि जातीच्या रक्षणासाठी जातबांधवांच्या आयुष्यावर जन्मापासून मरणापर्यत,नव्हे मरणानंतरही नियत्रण ठेवणारी जात पंचायत समूळ उखडून टाकण्याची वेळ आता आली आहे. रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून वाढत्या संख्येने उजेडात येत असलेल्या जातपंचायत आणि गावकीच्या जुलुमांच्या आणि वाळीत प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाड येथे जातपंचायतीच्या मनमानीविरुद्ध चौथी परिषद 8 फ़ेब्रुवारी 2015 रोजी आयोजित केली […]

Categories
अघोरी प्रथा

जातीतून बहिष्कृत केल्याने महिलेची आत्महत्या

जानेवारी - २०१५

गावकीच्या बहिष्काराचा बळी, खाजणीत मोहिनी तळेकरांची आत्महत्या; म. अंनिसच्या कार्यकर्त्यांची गावाला भेट भारतीय न्याय व्यवस्थेला समांतर न्याय व्यवस्था (खरे तर अन्याय व्यवस्था) आपल्या आजूबाजूला गावागावात, शहराशहरात चालू आहे. जात पंचायत वा गावकी हे त्या व्यवस्थेचे नाव. सामाजिक न्यायात या संमांतर न्याय व्यवस्थेचा सर्वात मोठा अडथळा ठरतो. म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘जातपंचायतीला मूठमाती अभियान’ महाराष्ट्र […]

Categories
जात पंचायत

पुरोगामी महाराष्ट्र जातपंचायतींच्या विळख्यात

जानेवारी - २०१५

ऊठसूट पुरोगामित्वाच्या गप्पा मारणाऱ्या व सामाजिक न्यायाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात सर्व काही अलबेल आहे, असं काही नाही. नागपुरला हिवाळी अधिवेशन चालु असताना, कोकणात गावकीमुळे बहिष्कृत झालेल्या मोहिनी तळेकर या महिलेने आत्महत्या केल्याचे प्रकरण घडले. प्रसार माध्यमांनी तो विषय लावून धरल्यामुळे विधानसभेत त्याची दखल घेतली गेली. या संदर्भात आम्ही कायदा तयार करणार असल्याचे सरकारच्या वतीने प्रसार […]

Categories
जात पंचायत

जातीत घेण्यासाठी १५ लाख रुपये दंड

जानेवारी - २०१५

तीन मुलांची आई असलेल्या शांताबाईचे पती मारुती यांचा खून झाला तो २००६ मध्ये. गोरख व सिकंदर या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला. २०१२ मध्ये हे दोघेही आरोपी कोर्टाने निर्दोष सोडले.शांताबाई मारूती शिंदे वैदू समाजाची. आरोपींना कोर्टाने निर्दोष सोडले असले तरीही भारतीय न्यायव्यवस्थेत समांतर न्याय व्यवस्था उभी करणाऱ्या जात पंचाचे मात्र समाधान होत नाही. त्यांनी शांताबाई, […]

Categories
जात पंचायत

दलितांवरील वाढते अत्याचार – अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टच्या मर्यादा!

वार्षिकांक – २०१४

दलित अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकारने 1989साली नव्या अनुसुचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्याची घोषणा केली. 30जानेवारी 1990साली त्यावर राष्ट्रपतींनीही सही केली व त्यानंतर पाच वर्षांनी नियमावली बनविण्यात येऊन अखेर 1995साली हा कायदा अंमलात आला. आज कायदा अस्तित्वात येऊन जवळजवळ 25वर्षे झाली आहेत. तरीही देशभरात दलितांवरच्या अत्याचारांची मालिका काही थांबलेली नाही. महाराष्ट्रात तर अलिकडे खैरलांजी, सोनई, […]

Categories
जात पंचायत

भय इथले संपत नाही…

वार्षिकांक – २०१४

विधानसभेची निवडणूक नुकतीच संपली, ज्यामध्ये मतदारराजाने भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात तुलनेने जास्त मताधिक्य टाकले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या 15वर्षेसत्तेत असलेल्या आणि कथित फुले–शाहू–आंबेडकरावादी सरकारचा जोरदार पराभव झाला. समतावादी भूमिका असलेल्या आघाडी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रात खैरलांजी दलित हत्याकांड घडलं, जिथे भोतमांगे कुटुंबियांना दीर्घ प्रतिक्षेनंतर तुटपुंजा न्याय मिळाला. जातीय अत्याचार आणि दलितांवरील हल्ल्यांचे सत्र सर्वत्र […]

Categories
जात पंचायत

आदिवासी गोंड व पद्मशाली जातपंचायत बरखास्त

ऑक्टोबर - २०१४

चंद्रपूरच्या पुढे पन्नास किलोमीटरवर मंगी हे गाव आहे. शंभराच्या आसपास आदिवासी गोंड समाजाची कुटुंबं येथे राहतात. आदर्श ग्राम पुरस्कार व तंटामुक्त गावाचा पुरस्कार मिळालेलं हे गाव. मात्र या गावास आदर्श गाव का म्हणायचे हा प्रश्न खुद्द गावकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. महाराष्ट्र अंनिस व प्रसारमाध्यमांमुळे अंधारात दडलेलं वास्तव जगासमोर आलं. साधारण पंधरा वर्षांपूर्वी लिला कोडपे या […]

Categories
जात पंचायत

जातपंचायती विरोधी तक्रारींचा ओघ अंनिसकडे सुरूच!

जुलै - २०१४

या महिन्यात नाशिकमध्ये एक छान घटना घडली. भटके जोशी समाजातील एक लग्न होते. या लग्नास बाळकृष्ण रेणके, मी, जातपंचायतीचे पंच, पूर्वी बहिष्कृत केलेल्या व्यक्ती हजर होतो. मराठी चित्रपटांचा कोरियोग्राफर सचीन हा आंतरजातीय विवाह केल्यानंतर प्रथमच सामुहिक कार्यक्रमात सहभागी झाला होता. याच पंचांनी बाळकृष्ण रेणके(केंद्र शासनाच्या भटक्या आयोगाचे अध्यक्ष असतांनाही) यांच्या पुतण्याच्या लग्नात समाजबांधवांनी उपस्थित न […]

Categories
जात पंचायत

जातपंचायतीला मूठमाती….

जून – २०१४

खाप पंचायतींचे अमानुष निर्णय, आंतरजातीय विवाह केल्याची शिक्षा म्हणून केले जाणारे(डिस) ऑनर किलिंग हे सगळे कुठेतरी दूर, मागास भागात घडते आहे, असे आपल्याला वाटत असते. शहरात राहणार्‍या, मध्यमवर्गीय, शिक्षित माणसाला दोन वर्षांपूर्वीपर्यंत हे खरेदेखील वाटले नसते की, माणसांचे मूलभूत हक्क हिरावून घेणार्‍या जातपंचायती महाराष्ट्रातही अस्तित्वात आहेत आणि त्यांची समाजजीवनावर पोलादी पकड आहे. गेल्या वर्षभरात जातपंचायतींच्या […]

Categories
जात पंचायत

जात पंचायतीला मूठमाती कशासाठी, कशाप्रकारे?

वार्षिकांक – २०१३

जात पंचायतीला मूठमाती या महाराष्ट्र अंनिसच्या मोहिमेत सर्व पातळ्यांवर आम्ही कृतिशील होत आहोत. आंतरजातीय लग्नाला सर्व ती मदत देणे, जात-बहिष्कृत व्यक्तींचे अनुभवकथन महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडवून या गंभीर समाजवास्तवला लोकांसमोर आणणे, हा त्याचाच एक भाग आहे. याबाबत कायदा असावा. तो कडक असावा व तो त्वरीत निर्माण व्हावा यासाठीचे प्रयत्न- हा त्याचा आणखीन एक भाग आहे. जात […]