उच्चवर्णियात व्होल्टेअर का निर्माण झाला नाही? आज तरी सगळी विद्वत्ता उच्चवर्णीयाकडे राहिली आहे. तथापि व्होल्टेअरची भूमिका घेण्यासाठी एक देखील उच्चवर्णीय पुढे सरसावला नाही. व्होल्टेअरपाशी बुद्धीचा प्रामाणिकपणा होता. तो स्वत: ज्या कॅथॉलिक चर्चमध्ये वाढला, त्या चर्चच्या तत्वप्रणालीविरूद्ध त्याने आपला संघर्ष उभा केला. असा व्होल्टेअर इथल्या तथाकथित ज्ञानाच्या ठेकेदारांत भविष्यकाळातही उमटण्याची चिन्हे दिसत नाहीत. तुर्कस्तानच्या सुलतानने मुस्लिम […]