Categories
जात पंचायत

वैदु जातपंचायत रद्द : अंनिसच्या लढ्याचे मोठे यश

एप्रिल - २०१५

दि.15/03/2015 रोजी वैदू समाज बांधवांनी महाराष्ट्रातील वैदू समाज जात पंचायत रद्द केल्याची घोषणा केली. ही घोषणा महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. वैदू समाज जातपंचायती विरूद्धच्या सतत दीड वर्षेदिलेल्या लढ्यात आलेले यश आपल्या चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठी खूप आनंददायी असले तरीही हा निर्णय झालेनंतर मनात हूरहूर वाटत होती. हा आनंद द्विगुणित करायला, चळवळीत आलेले […]

Categories
जात पंचायत

अंनिवा ‘मे 2015’ चा जातपंचायतविरोधी विशेषांक

एप्रिल - २०१५

अंनिसच्या लढ्याची यशोगाथा नक्की वाचा पुढील अंकात…! आंतरजातीय विवाह केला म्हणून एका बापाने आपल्या गरोदर मुलीचा जीव घेतला. या अमानुष घटनेची नोंद अंनिसने घेतली. नाशिक येथे घडलेल्या या घटनेबाबत जातपंचायतीच्या पंचांना जाब विचारण्यासाठी संबंधित जातीतील गांजले गेलेले लोकही मदतीला आले. डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी नाशिकमध्ये जातपंचायतीच्या अमानुष जुलमाच्या विरोधात एल्गार सुरू केला. संपूर्ण महाराष्ट्रात अन्यायग्रस्त लोक पुढे […]

Categories
जात पंचायत

जात पंचायतीच्या/गावकीच्या मनमानी विरोधी कोकणस्तरीय एल्गार परिषद

मार्च - २०१५

जात हीच एक अंधश्रद्धा आहे आणि जातीच्या रक्षणासाठी जातबांधवांच्या आयुष्यावर जन्मापासून मरणापर्यत,नव्हे मरणानंतरही नियत्रण ठेवणारी जात पंचायत समूळ उखडून टाकण्याची वेळ आता आली आहे. रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून वाढत्या संख्येने उजेडात येत असलेल्या जातपंचायत आणि गावकीच्या जुलुमांच्या आणि वाळीत प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाड येथे जातपंचायतीच्या मनमानीविरुद्ध चौथी परिषद 8 फ़ेब्रुवारी 2015 रोजी आयोजित केली […]

Categories
अघोरी प्रथा

वैदू जातपंचायतचे क्रौर्य : अंनिसमुळे तक्रार दाखल

मार्च - २०१५

पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रामध्ये आजही अनेक अनिष्ट रूढी, परंपरा जातवास्तव टिकून आहेत. “भारतीय राज्य घटने”नुसार कायद्याचे राज्य असताना जात पंचायत पूर्णत: बेकायदेशीरपणे कार्यरत आहेत. सध्या राज्यात जातपंचायतच्या दहशतीच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यातील झारगडवाडी(ता.बारामती, जि.पुणे) येथील घटना अंगावर शहारे आणणारी आहे. झारगडवाडी बहुतांशी वैदू लोकांचे राहण्याचे ठिकाण गावच्या सरपंचाच्या वार्डात येत असल्याने जातपंचायतचा पंच व […]

Categories
अघोरी प्रथा

थुंकी चाटण्याच्या शिक्षेस नकार देणाऱ्या बंगालमधील मुलीवर जातपंचांचा बलात्कार

जानेवारी - २०१५

साधारण तीन महिन्यांपूर्वी वृत्तपत्रात एक बातमी वाचनात आली. पश्चिम बंगालमधील धुपगुड़ी गावात थुंकी चाटण्याच्या शिक्षेस नकार देणाऱ्या मुलीवर सामुहिक बलात्कार करण्याचा आदेश जातपंचायतीने दिला. संपूर्ण बातमी वाचून मन अस्वस्थ झाले. सध्याच्या इंटरनेट युगात असं काही घडतंय यावर विश्वास बसेना. गुगल वर एका क्षणात धुपगुड़ी आलं मात्र नाशिक पासुनचे अंतर दोन हजार दोनशे कि.मी. होते. या […]

Categories
अघोरी प्रथा

जातीतून बहिष्कृत केल्याने महिलेची आत्महत्या

जानेवारी - २०१५

गावकीच्या बहिष्काराचा बळी, खाजणीत मोहिनी तळेकरांची आत्महत्या; म. अंनिसच्या कार्यकर्त्यांची गावाला भेट भारतीय न्याय व्यवस्थेला समांतर न्याय व्यवस्था (खरे तर अन्याय व्यवस्था) आपल्या आजूबाजूला गावागावात, शहराशहरात चालू आहे. जात पंचायत वा गावकी हे त्या व्यवस्थेचे नाव. सामाजिक न्यायात या संमांतर न्याय व्यवस्थेचा सर्वात मोठा अडथळा ठरतो. म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘जातपंचायतीला मूठमाती अभियान’ महाराष्ट्र […]

Categories
जात पंचायत

भय इथले संपत नाही…

वार्षिकांक – २०१४

विधानसभेची निवडणूक नुकतीच संपली, ज्यामध्ये मतदारराजाने भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात तुलनेने जास्त मताधिक्य टाकले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या 15वर्षेसत्तेत असलेल्या आणि कथित फुले–शाहू–आंबेडकरावादी सरकारचा जोरदार पराभव झाला. समतावादी भूमिका असलेल्या आघाडी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रात खैरलांजी दलित हत्याकांड घडलं, जिथे भोतमांगे कुटुंबियांना दीर्घ प्रतिक्षेनंतर तुटपुंजा न्याय मिळाला. जातीय अत्याचार आणि दलितांवरील हल्ल्यांचे सत्र सर्वत्र […]

Categories
जात पंचायत

आदिवासी गोंड व पद्मशाली जातपंचायत बरखास्त

ऑक्टोबर - २०१४

चंद्रपूरच्या पुढे पन्नास किलोमीटरवर मंगी हे गाव आहे. शंभराच्या आसपास आदिवासी गोंड समाजाची कुटुंबं येथे राहतात. आदर्श ग्राम पुरस्कार व तंटामुक्त गावाचा पुरस्कार मिळालेलं हे गाव. मात्र या गावास आदर्श गाव का म्हणायचे हा प्रश्न खुद्द गावकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. महाराष्ट्र अंनिस व प्रसारमाध्यमांमुळे अंधारात दडलेलं वास्तव जगासमोर आलं. साधारण पंधरा वर्षांपूर्वी लिला कोडपे या […]

Categories
जात पंचायत

जातपंचायतीला मूठमाती

वार्षिकांक – २०१३

व्यक्तीला जन्मतःच लागणारी आणि कोणत्याही कारणाने न बदलणारी जात तिला नष्ट करण्याच्या सर्व प्रयत्नांना पुरून उरली आहे. जातीबद्दल असे म्हटले गेले आहे ‘जी जात नाही ती जात’. आधुनिक काळातही नवीन संदर्भांसहीत हा जातीचा प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपात पुढे येत आहे. नाशिक शहरात जोशी (भटक्या) समाजातील एका तरूण गरोदर स्त्रीची आंतरजातीय विवाह केल्याबद्दल तिच्या स्वतःच्या वडिलांनी नुकतीच […]

Categories
जात पंचायत

जात पंचायतीला मूठमाती कशासाठी, कशाप्रकारे?

वार्षिकांक – २०१३

जात पंचायतीला मूठमाती या महाराष्ट्र अंनिसच्या मोहिमेत सर्व पातळ्यांवर आम्ही कृतिशील होत आहोत. आंतरजातीय लग्नाला सर्व ती मदत देणे, जात-बहिष्कृत व्यक्तींचे अनुभवकथन महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडवून या गंभीर समाजवास्तवला लोकांसमोर आणणे, हा त्याचाच एक भाग आहे. याबाबत कायदा असावा. तो कडक असावा व तो त्वरीत निर्माण व्हावा यासाठीचे प्रयत्न- हा त्याचा आणखीन एक भाग आहे. जात […]