मागील वर्षी अभिनेता अमिर खानने स्टार वाहिनीवरून ‘सत्यमेव जयते’ हा सामाजिक प्रश्नाबद्दलचा कार्यक्रम सादर केला. ह्या बहुचर्चित कार्यक्रमाच्या एका भागात खाप पंचायत हा विषय घेऊन चर्चा झाली. ते बघून महाराष्ट्रात अशा जातपंचायती असतील, असे कुण्या संवेदनशील मनाला वाटलं नाही. त्यामुळे राज्यात त्यावर एका शब्दाचीही चर्चा झाली नाही. परंतु महाराष्ट्रातील जातपंचायतीचे आजचे वास्तव भयावह आहे. बहुतांश […]
टॅग: जातपंचायत
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नाशिक येथे 8 ऑगस्ट 2013 रोजी सदर परिषद समितीच्या नाशिक शाखेतर्फे आयोजित करण्यात आली होती. जातपंचायतीच्या प्रभावाखाली येऊन नाशिकमध्ये एका पित्याने त्याच्या गर्भवती मुलीचा गळा आवळून जीव घेतल्याची घटना 29 जून 2013 रोजी नाशिकमध्ये घडली. विविध प्रसारमाध्यमांतून याबाबत निषेध आणि चौकशीचा सूर उमटला ‘दै.सकाळ’ने ह्याबाबत विशेष बाजू मान्यवरांच्या प्रतिक्रियांसह मांडली. ‘सकाळ’ […]
“जातपंचायतीविरूद्धच्या संघर्षात उत्साह नकोच. फार विचारपूर्वक पुढे नेण्याचा हा लढा आहे. जातपंचायतींच्या तळाशी काय आहे, त्याचा विचार या संघर्षात करावाच लागेल”, अशी अपेक्षा ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी जळगाव येथे व्यक्त केली. ‘जात पंचायतीला मूठमाती’ संघर्ष परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती […]
जातीव्यवस्था आणि जातपंचायती
जाती पंचायतीची आज जी चर्चा सुरू आहे ती भटक्या विमुक्त समाजातील जातपंचायतीमुळे. या जातपंचायतींनी आजवर अमानुष वाटावेत असे निर्णय बिनदिक्कत घेतले आहेत. जे भारतीय राज्यघटनेला फाट्यावर मारणारे आहेत. या जाती पंचायतींचा अमानुष स्वरूपाचा दरारा लक्ष्मण माने, अशोक पवार, विमल मोरे, आदी अनेक लेखकांच्या लेखनातून– आत्मचरित्रातून पुढेे आलेला आहे. त्यांचा त्याविरूद्ध संघर्ष आजही सुरू आहे. शिकलेल्या […]
जातपंचायती विरोधात एल्गार
अखेर जातपंचायतीच्या दडपशाहीच्या व जुलमाविरोधात एल्गार सुरू झाला. कारण घडले आंतरजातीय विवाह केलेल्या गर्भवती मुलीचा तिच्या पित्यानेच गळा आवळून केलेल्या खुनाचे. सुरेश भटाच्या गझलमध्ये म्हटल्याप्रमाणे समाजाचे नियमन करणार्या ठेकेदारांनी विविध प्रकारचे ठेके घेतले… धर्मातील अनिष्ट प्रथांचे ठेके, वर्णव्यवस्थेचे ठेके तसेच जातपंचायतीचे ही ठेके. जातपंचायतीच्या तथाकथीत ठेकेदार पंचांनी आजपर्यंत किती जणांना वाळीत टाकले असेल, किती मुलींचा […]
दि.26 जून रोजी प्रमिलाचा वाढदिवस होता. आदल्या दिवशी भल्या पहाटे तिचे वडील तिच्या सासरच्या घरी गेले. प्रमिलाची आई आजारी असल्यामुळे भेटण्यासाठी प्रमिलाला त्यांनी सोबत घेतले. सोबत आणलेली रिक्षा दवाखान्याजवळ आल्यानंतर प्रमिलाच्या वडिलांनी रिक्षा चालकास दवाखान्यात पाठविले. आणि शांतपणे सोबत आणलेल्या दोरीने त्याने प्रमिलाचा गळा आवळला. जमलेल्या जमावाने प्रमिलास दवाखान्यात नेण्याअगोदरच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याला […]
कधी संपणार जात पंचायती?
‘आंतरजातीय विवाह केला म्हणून कुटुंबाकडून मुलाचा किंवा मुलीचा खून.’ अशा क्लेशदायक बातम्या आता सारख्या वाचायला, ऐकायला मिळतात. त्यातही प्रामुख्यानं मुलीचाच खून होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आपल्या परंपरेत मुलगी म्हणजे कुटुंबाची इज्जत असते. प्रतिष्ठा असते. तिचं पाय वाकडं पडलं, की कुटुंबाचीच प्रतिष्ठा खलास होते म्हणून तिलाच खलास करण्याचा अधिक प्रयत्न होतो. तिचा बालविवाह करण्याचा प्रयत्न होतो […]
जातीअंताचा यक्षप्रश्न
व्यक्तीला जन्मतानाच लाभणारी आणि कोणत्याही कारणाने न बदलणारी जात ही तिला नष्ट करण्याच्या सर्व प्रयत्नांना पुरून उरली आहे. तिचे नवीन नवीन संदर्भ आणि शोषण करण्याची ताकद ही वेगवेगळ्या स्वरूपात पुढे येते व कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला भयचकित करते. मागील काही दिवसातील महाराष्ट्रातील घटना याची साक्ष आहेत. त्याकडे वळण्यापूर्वी भारतीय प्रबोधनात जातीला का धक्का लागला नाही हे […]
हरियाणातल्या खाप पंचायतींविरोधी लढा
गेल्या महिन्यात नाशिक शहरात जोशी(भटक्या) समाजातल्या एका तरूण गरोदर स्त्रीची तिच्या स्वत:च्या वडिलांनी आंतरजातीय विवाह केल्याबद्दल निर्घृण हत्या केली. नंतर असे निष्पन्न झाले की, समाजाच्या जात पंचायतीच्या धाकाला घाबरून त्यांनी असे केले होते. ह्या निमित्ताने जात पंचायतींचा प्रश्न महाराष्ट्रात चर्चेला आला आहे. रूढ अर्थाने विचार केला तर भटका समाज हा आपल्या समाजव्यवस्थेत परीघावरचा घटक आहे. […]
अंनिसचे जात पंचायतीला ‘मूठमाती’ अभियान
मूळात जात मानणे ही अंधश्रद्धा आहे, कारण जातीला कुठलाही भौतिक आधार नाही. जातीचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणून सांगण्यात येते ‘जी जात नाही, म्हणजे जी नष्ट होत नाही, ती जात’. अशा जातींची व पोटजातींची भारतातील संख्या 8000 पेक्षा जास्त आहे. शेकडो वर्षेआपल्या हाडीमाशी खिळलेल्या या जाती एकदोन पिढ्यात नष्ट होणार नाहीत, हे जरी खरे असले तरी […]