Categories
अभियान महिला

महिला सक्षमीकरणासाठी अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन अभियान

फेब्रुवारी – २०१५

अकोला येथे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या राज्य कार्यकारिणीत ठरल्याप्रमाणे ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने’ संपूर्ण महाराष्ट्रभर महिला सक्षमीकरणासाठी अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन अभियान राबविले. 3 जानेवारी या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मादिवसापासून ते 12 जानेवारी या जिजाऊ यांच्या जन्मदिनापर्यंत हे अभियान राबवण्यात आले. सदर लेखातून या अभियानाचा वृत्तांत देण्यात येत आहे. अभियानाचे उद्घाटन व समारोप या कार्यक्रमासह राज्याच्या […]

Categories
अभियान

फटाकेमुक्त अभियान कृतीशील संवेदना

ऑक्टोबर - २०१४

20 ऑगस्ट 2013 रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, साधना साप्ताहिकाचे संपादक व महाराष्ट्रातील थोर विचारवंत म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुणे शहरात काही समाजकंटकांकडून हत्या झाली. या हत्येने महाराष्ट्रातील प्रत्येक संवेदनशील माणूस हळहळला. याला आम्हीही अपवाद नव्हतो. मात्र यावेळी आपल्या संवेदनशीलतेला कृतीशील रूप देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला नि त्याला छात्राध्यपकांकडून तसेच […]

Categories
अभियान कव्हर स्टोरी

जादूटोणाविरोधी कायदा जनसंवाद यात्रा

जुलै - २०१४

वाचकहो, मे 2014 च्या अंकात आपण जादूटोणा विरोधी कायदा प्रभावी अंमलबजावणीसाठी जनसंवाद यात्रेची सफर गडचिरोली जिल्ह्यापर्यंत केली. आता आपण ही सफर पुढे चालू करत आहोत. चंद्रपूर जिल्ह्यापासून 16 एप्रिल सकाळी 9.30 ते 12.30 शरदचंद्र पवार विद्यालय, व्याहाडखुर्द (ता.सावली) चा कार्यक्रम करून दुपारी 1.30 ते 3.30 राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालय(सावली) येथे कार्यक्रम सादर […]

Categories
अभियान

जनसंवाद यात्रेचा कोल्हापूरात समारोप

जुलै - २०१४

18 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हौतात्म्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत दि.22 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायद्याचा वटहुकूम काढला आणि दि. 18 डिसेंबर नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केला. या कायद्यामुळे अंधश्रद्धेमुळे घडणार्‍या काही विशिष्ट कृती या गुन्हा ठरवल्या असून असा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. वटहुकुमानंतर लागलीच या कायद्यानुसार […]

Categories
अभियान कायदा

थक्क करणारा प्रतिसाद आणि सलग यात्रेचा विलक्षण अनुभव

मे - २०१४

जादूटोणाविरोधी कायदा- प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रव्यापी जनसंवाद यात्रा दि.9 मार्च 2014 पासून चवदार तळे, महाड, जि.रायगड येथून सुरू झाली. आजपर्यंतचा(दि.15 एप्रिल 2014) या यात्रेचा प्रवास वाचकांसाठी थोडा सविस्तर लिहित आहे. ज्या कायद्यासाठी शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी 18 वर्षे अथक परिश्रम घेतले. पण त्याची अंमलबजावणी पहाण्यासाठी आज डॉक्टर आपल्यात नाहीत ही वेदना मनात आहेच. कायदा झाला पण […]

Categories
अभियान कायदा

जादूटोणाविरोधी कायद्याची राज्यव्यापी जनसंवाद यात्रा

एप्रिल - २०१४

महाड येथील चवदार तळ्यावरून यात्रेची सुरुवातडॉ.बाबा आढावांनी दाखविला हिरवा झेंडा!८५ दिवस, ३४ जिल्हे आणि २५० पेक्षा जास्त कार्यक्रमांधून होणार प्रबोधन. ‘जादूटोणा विरोधी कायदा- प्रभावी अंमलबजावणी मोहीम’ 9 मार्च 2014 पासून ‘चवदार तळे, महाड(जि.रायगड)’ येथून सुरू झाली, कष्टकर्‍यांचे नेते डॉ.बाबा आढाव यांनी हिरवा झेंडा दाखवून 31 मे अखेरपर्यंत 85 दिवसांत महाराष्ट्राच्या 34 जिल्ह्यांमधून 250 पेक्षा जास्त […]

Categories
अभियान

गारपीटग्रस्तांच्या संवादासाठी मानसमित्र अभियान

एप्रिल - २०१४

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व डॉ.नरेंद्र दाभोलकर अध्यासन केंद्र, राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या वतीने, गारपीटग्रस्त बाधीतांशी संवाद करण्याकरिता, स्वतंत्रपणे दीर्घकालीन असे मानसमित्र अभियान परिणामकारक राबविण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र विवेक वाहिनीचे राज्य कार्याध्यक्ष डॉ.हमीद दाभोलकर व मानसमित्रचे समन्वयक डॉ.प्रदीप पाटकर यांनी दिली. ते लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मानसमित्र विभागीय प्रशिक्षण शिबीराच्या कृतीकार्यक्रम सत्रामध्ये प्रमुख वक्ते […]

Categories
अभियान

बोईसर येथे झाले लिंबू-मिरची टांगणे बंद अभियान

मार्च - २०१४

“लिंबू-मिरची टांगणे” या अंधश्रद्धेबाबत लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती- पालघर शाखा तर्फे लायन्स क्लब ऑफ तारापूर आणि इंडियन मेडिकल असोसिएशन-बोईसर शाखा यांच्या सहयोगाने “लिंबू-मिरची टांगणे बंद अभियान” राबविण्यात आले. या अभियानाची सुरवात बुधवार दि.5/2/2014 रोजी सकाळी 10 वाजता बोईसर रेल्वे स्टेशन येथे झाली. अंनिस पालघरचे कार्याध्यक्ष मा.बी.पी.गोसावी यांनी पत्रकाचे वितरण केले. अंनिस पालघरचे […]

Categories
अभियान

जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठीजळगाव जिल्ह्यात तरूणांची सायकलफेरी

जानेवारी - २०१४

20 ऑगस्ट उजाडला अनपेक्षितपणे. दाभोलकरांच्या खुनाची बातमी आली. ससूनला पोचलो. या अवस्थेत ‘रडायचं नाही, भिडायचं आता’ हा आवाज आतून आला. अशातच पुणे येथे राज्यकार्यकारिणीची बैठक झाली. जादूटोणा विरोधी कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे व्हायलाच हवा. यासाठी सार्‍यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करायचे ठरविले. आणि जळगाव जिल्ह्यात डिसेंबर मध्ये ठरविलेली सायकल फेरी, कायदा लोकांपर्यंत घेऊन जाणं आणि […]

Categories
अभियान

जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठी तरूण वारकर्‍यांची ‘विवेकवारी’

जानेवारी - २०१४

डॉ.सदानंद मोरे, वाभळे महाराज व महाराष्ट्रातील विवेकी संत सुधारक साथी यांनी जादूटोणा विरोधी कायदा हा संताचा वारसा पुढे नेणारे पाऊल आहे अशी भूमिका घेतली. त्यांनी वारकर्‍यांना फितवणार्‍या सनातनी शक्तींच्या विरोधी भूमिकेचा समाचार घेऊन सरकारचे व जनसामान्यांचे यशस्वी प्रबोधन केले.तरूण युवा कीर्तनकार सचिन पवार, हनुमंत पवार, गणेश दळवी, सचिन गोरडे,मधुकर भोसले, सपना कंदले, सोमेश गिते, विठ्ठल […]