Categories
बुवाबाजी

धार्मिक डेरे आणि राजकारणाची अभद्र युती – सुमित सिंह

जानेवारी - २०१५

हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील कसबे बरवाला येथील सतलोक आश्रमातील तथाकथित संत रामपाल याला नोव्हेंबर २०१४ मध्ये पंजाब-हरयाणा हायकोर्टाच्या आदेशावरून अटक केली. मात्र त्यासाठी त्यांना फारच मेहनत करावी लागली. त्यासाठी त्यांना पोलीस आणि सुरक्षा दलाच्या ३० कंपन्या व त्याव्यतिरिक्त ४०० पोलीस वाहने, ३०० बसेस आणि ४० बुलेटप्रुफ गाड्या आणि २० पोलीस नियंत्रण कक्षांचा वापर केला गेला. यासाठी […]

Categories
बुवाबाजी

मौलवीचा महिलेवर बलात्कार!

जुलै - २०१४

सांगली शहरापासून जवळच असलेल्या नांद्रे या गावातील दर्गा अघोरी उपचारासाठी प्रसिद्ध आहे. या दर्ग्यातील अघोरी उपचारासंदर्भात सांगली अं.नि.स.ने विशेष मोहीम राबविली आहे. याच दर्ग्यामध्ये भाविकांसाठी नमाजपठणाचे काम करणारा मौलवी जमीर मुजावर(वय 25 वर्षे) याने धंद्यात बरकत मिळवून देणे, हातामध्ये पैसा टिकवून देतो अशा बाता मारून एका हातगाडीवाल्याला ठकविले व त्याच्या घरी धार्मिक पूजा करण्याच्या नावाखाली […]

Categories
बुवाबाजी

झुलेलाल महाराजांचा फसवा अवतार स्वामी ग्यानदीपकला अटक

मे - २०१४

पिंपरीतील भोंदूबाबा स्वामी ग्यानदीपक उर्फ दीपक मोटवानी याला जादूटोणा विरोधी कायद्याखाली पोलिसांनी जेरबंद केल्याची बातमी विविध वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद. 25 दिवसांपूर्वी या बाबाचे विरोधात पिंपरीतील एका कुटुंबाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करण्याचे धाडस केल्यामुळेच हे घडू शकले. अन्यथा गेली 15 वर्षे चालू असलेला देवावताराच्या नावाखालचा हा गोरख धंदा चालूच राहिला असता. […]

Categories
बुवाबाजी

‘काल्या’ बनला ‘हरिओमबाबा’

फेब्रुवारी – २०१४

साधारण दोन वर्षांपूर्वी देवळा तालुक्यातील वरवंडी गावात भगवान शंकरासारखे दिसणारे एक महाराज प्रकट झाले. स्वत:च्या अंगाखांद्यावर जिवंत साप घेऊन फिरत असल्यामुळे पंचक्रोशीत चर्चा सुरू झाली. हरिओमबाबा असं त्यांचं नाव असल्याचं समजलं. वनविभागाच्या पाच एकर जमिनीवर आक्रमण करत आश्रम बांधण्याची तयारी सुरू झाली. तीस कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित होता. बाबा बंगालवरून आले आहेत. त्यामुळे त्यांना काळी […]

Categories
बुवाबाजी

बापूचे ‘काम’काज

वार्षिकांक – २०१३

आसारामसारख्या तथाकथित आध्यात्मिक बुवाचे पितळ मिडियाने उघड केले. आचार्य अत्र्यानी केडगावच्या नारायण महाराजाची बिंगे फोडण्यापासून ते आजतागाईत विवेकी माध्यमे हे काम करीत आहेत. तरीही बुवाबाजी कमी का होत नाही? कारण यौनशोषण व पैसा यासाठी अध्यात्माची झूल पांघरणे ही आपली परंपरा आहे. पण अध्यात्मिक गुरु हा माणूसच असतो व विविध वासनापासून सुटू शकत नाही, हे आपण […]

Categories
बुवाबाजी

दावूनी वैराग्याच्या कळा। भोगी विषयाचा सोहळा ॥

वार्षिकांक – २०१३

आचार्य अत्रे लिहितात, “बुवा म्हणजे धनलोभाचे, व्यभिचाराचे आणि व्यसनांचे मूर्तीमंत नरककुंड. बुवाबाजी हे समाजावरचे महाभयंकर संकट आहे. दारू किंवा जुगारापेक्षाही विनाशकारक व्यसन म्हणजे बुवाबाजी. बुवाबाजीपुढे अक्कल मुळी कामच करत नाही. ‘बुवा’ दिसला की आमच्या मेंदूला पक्षाघात होतो. आमचे संस्कार, आमचे शिक्षण, आमची अक्कल आणि आमचा शहाणपणा ‘बुवा’च्यापुढे सपशेल लोटांगण घालतो. म्हणून बुवाबाजी हा इंडियन पीनल […]

Categories
बुवाबाजी

श्रद्धेच्या नावाने…

वार्षिकांक – २०१३

मीरा नंदा या आधुनिक विज्ञानाच्या इतिहासातील तज्ञ आहेत. फ्रंटलाईन पाक्षिकाच्या (4, ऑक्टोबर, 2013) अंकातील ‘इन द नेम अ‍ॅाफ फेथ’ या त्यांच्या लेखाचा राजीव देशपांडे यांनी हा संपादित केलेला स्वैर अनुवाद. एका पातळीवर आसारामला झालेली अटक ही काही नवीन घटना नाही. आणखी एका बाबाचे भांडाफोड झाले, इतकेच! त्यात नवीन ते काय? तसे पाह्यला गेलो तर, या […]

Categories
बुवाबाजी

ऐसे कैसे झाले भोंदू

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

बुवा, बाबा, स्वामी, महाराज, गुरू यावरील विश्वास हा खरे तर श्रद्धेचा मामला असतो. ज्या गुरूवर, बाबावर माझी श्रद्धा असते तिला माझ्या कल्याणाविषयी पूर्ण आस्था आहे. माझे कल्याण तिच्या हातात सुरक्षित आहे, अशी भक्ताची भावना असते. महाराजांच्यावर भक्त पूर्णत: विसंबून असतो. स्वामी अथवा महाराज आपल्याला दगा देतील ही कल्पनाही तो सहन करू शकत नाही. लहान मुलांची […]

Categories
बुवाबाजी

मांत्रिकाच्या दरबारात उपचारादरम्यान महिलेचा झाला मृत्यू….

जुलै - २०१३

धामोरी, ता.कोपरगाव येथील अलका रवींद्र तुपसेंद्रे ही पंचवीस वर्षांची महिला. एवढ्या कमी वयातच तीन अपत्यांची आई झाली. त्यातच नवर्‍याशी एक दिवस कडाक्याचे भांडण झाले; त्यात तिने विष प्राशन केले. तिला तात्पुरते दवाखान्यात दाखविले. घरी आल्यानंतर तिला मानसिक आजाराने सौम्य झटके येऊ लागले. नंतर मात्र तिच्या नवर्‍याने व आईने मनोविकार तज्ञांकडे नेले नाही. सर्व कुटुंबच अंधश्रद्धेत […]

Categories
बुवाबाजी

भोंदूबाबाच्या सल्ल्याने अत्याचारी गर्भपात

जून – २०१३

            सौ.सुवर्णा खंडेराव गायकवाड ही नाशिकच्या म्हसरूळ भागात राहणारी अवघी वीस वर्षांची नवविवाहित तरूणी. मागील वर्षी तिचे लग्न झाले. नवरा औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारा. अतिशय आनंदात संसार चालू होता. तिच्या घरातील सासू-सुनेचे संबंध फारसे काही बरे नव्हते. तिच्या घरचं वातावरणही अंधश्रद्धेने प्रभावित झालं होतं. कारण तिची सासू व नवरा हे निफाड येथील एका भोंदू बाबाकडे […]