Categories
बुवाबाजी

भोंदू देवऋषी लक्ष्मण चाळकेचा अंनिसपुढे माफीनामा

जून – २०१३

चाळकेवाडी, ता.जि.सातारा येथील प्रसिद्ध देवऋषी लक्ष्मण गणू चाळके याने अंनिस कार्यकर्त्यांसमोर सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये सपशेल माफीनामा लिहून दिला. गेली अनेक वर्षेकालभैरव-चाळकेवाडी ग्रामदैवत मंदिरात भूत, भानामती, करणी, मूठ मारणे, मांड भरणे यावर कालभैरव अंगात आणून भक्तांच्या समस्या सोडवण्याचा दावा करणारा हा बाबा अंनिसपुढे लडबडला. सकाळी 8 वाजता अंनिसची टीम सातारा तालुका पोलिसांसह देवऋषाच्या दरबारात पोचली. […]

Categories
बुवाबाजी

महिलेवर बलात्कार करणार्‍या भोंदूबाबा आवळीकर मामाला अटक

फेब्रुवारी – २०१३

महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी बानगे(ता.कागल) येथील भोंदूबाबाला कागल येथील न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. शंकर दादू निंगूरे उर्फ आवळीकर मामा असे या भोंदूबाबाचे नाव आहे.             तीन मुली असलेल्या एका विवाहित महिलेला मुलगा व्हावा, यासाठी पतीचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी नवससायास केले जात होते. या महिलेला बानगे येथील आवळीकर मामाकडे जाण्याचा सल्ला देण्यात […]

Categories
बुवाबाजी

देवी प्रगटल्याचा बनाव उघड

ऑक्टोबर - २०१२

1 जुलै 2012 रोजी वर्तमानपत्रात एक बातमी आली. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्याच्या शेवटच्या टोकावर निमज या भोंड्या माळावर वसलेल्या गावात शुक्रवार तारीख 29 जून 2012 रोजी रात्री 12 वाजता एक देवी प्रगट झाली. देवी म्हणजे देवीची सोन्याची मूर्ती जमिनीतून आवाज काढत उगवली. त्यामुळे तिच्या पुढं भक्तांची रांग लागली. पहिल्या पहिल्यांदा सर्वांनीच त्या बातमीकडे दुर्लक्ष केलं. […]

Categories
बुवाबाजी

णमोकार मंत्राने पाच मिनिटात रोगमुक्त करणारे निमेशभाई शहा

जून – २०१२

            अहमदाबादचे निमेशभाई शहा हे सर्वसाधारण व्यक्तीमत्व नाही. त्यांना महावीरांची लब्धी(दैवी शक्ती) प्राप्त झाली असून जैन धर्माच्या नमोकार मंत्राच्या पठनाने एकाच वेळी व हजारो लोकांचे कोणतेही आजार फक्त पाचच मिनिटांत बरे करण्याचा त्यांचा दावा आहे. दि.22 एप्रिल 2012 रोजी लासलगाव(जि.नाशिक) येथील त्यांचे ‘निशुल्क रोग निवारण शातावेदनीय शिबीर’ झाले. निमेशभाईचे चमत्कार व दैवी शक्ती तपासण्यासाठी मी […]

Categories
बुवाबाजी

 निर्मलबाबाचा दूषित बोध

जून – २०१२

            झारखंडमधील एका दैनिकामुळे आणि त्यानंतर काही वृत्तवाहिन्यांनी दाखवलेल्या बातम्यांमुळे निर्मलबाबाचा पर्दाफाश झाला. गेली अनेक वर्षे तो स्वत:ला सहावे अद्भूत इंद्रिय लाभले आहे, असे सांगून लोकांची फसवणूक करत असे. विविध असाध्य आजार बरे करणे, वेगवेगळे प्रश्न सोडवणे यासाठी आपण मदत करतो असे सांगून तो लोकांकडून हजारो रूपये उकळत असे. ‘ऐसे कैसे झाले भोंदू’सारख्या अभंगातून संत […]

Categories
बुवाबाजी

बाटली नाचली… भानामती पळाली

मार्च - २०१२

            भक्तांना झपाटणारी भूतं पकडून बीअरच्या काळ्या बाटलीत कोंबणं, ही मिर्झा महाराजाची ख्याती. डोळ्यांच्या इशार्‍यावर बाटलीसह भुतांना नाचविणं, हा तर त्याच्या डाव्या हाताचा मळ. अशा या बुवाची जादुई बाटली ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी हस्तगत केली. त्याच्यासमोरच दहादा नाचवली. मग काय, महाराजाची भुताटकी पुरती भेदरली. चंबुगबाळ आवरून गाझियाबादच्या दिशेने गायब झाली.             गेल्या एक महिन्यापासून सातारा येथील पोवई […]

Categories
बुवाबाजी

  भारतीय साधूची अमेरिकेत सेक्स साधना

फेब्रुवारी – २०१२

भारतीय साधू अमेरिकेत गेला. हायटेक आध्यात्मिक गुरू झाला. लोकांना मनावर नियंत्रण ठेवण्याचे सल्ले देणारा हा स्वामी स्वत:च्या मनावर मात्र ताबा नाही ठेवू शकला…. कामभावनांच्या आहारी गेला. त्याला लैंगिक विकृती जडली. आश्रमातीलच दोन 12 वर्षांच्या मुलींचे त्याने लैंगिक शोषण सुरू केले. मुली मोठ्या झाल्या. स्वामीचे अत्याचार दिवसेंदिवस वाढू लागले. अखेर दोन्ही मुलींनी धाडस करून पोलिसांत स्वामीच्या […]

Categories
बुवाबाजी

भोंदूबाबाने पैशाचा पाऊस पाडण्याच्याअमिषाखाली शिक्षकाला लाखोस गंडवले!

सप्टेंबर - २०११

            पैशाचा पाऊस पाडून पैसे दुप्पट करून देतो असे म्हणणार्‍यांवर विश्वास ठेवून पैसे देणारे नागरिक बहुतांशी अशिक्षित असल्याचे आढळत असले, तरी चक्क एका शिक्षकालाच एक भोंदूबाबा जेव्हा तब्बल साडेतेवीस लाखांना गंडवतो तेव्हा त्या शिक्षकाची कीव करावी का त्याचा उपहास करावा? होय, अशीच घटना घडली जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात!             जामनेर तालुक्यातील गोंडखेडा गावी सुरेश कडू […]

Categories
बुवाबाजी

गावकर्‍यांनी आणि अंनिसने केला बुवाचा भांडाफोड

जून – २०११

            शाखेच्या रविवारच्या मिटिंगमध्ये वडाचीवाडीच्या सरपंचांचे पत्र ठेवण्यात आले. हे पत्र उपसरपंच अजित भोसले यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सातारा शाखेला सादर केले होते. पत्रात लिहिले होते… “देवऋषी आनंदराव लक्ष्मण पवार, ही व्यक्ती आमच्या गावात दर गुरूवारी दरबार भरवून देवऋषीपणा करते. भोळ्या भाबड्या लोकांना लुबाडते. त्यासाठी ताईत, गंडे दोरे, मंतरलेले लिंबू, अंगार्‍याच्या पुड्या देऊन लोकांचे पैसे […]

Categories
बुवाबाजी

बालिकेचा विनयभंग करणारा भोंदूबाबा अटकेत

जून – २०११

चाळीसगाव(जि.जळगाव) येथील पाटणादेवी रोडवरील सैलानीबाबा दर्ग्यावरील नुरोद्दिन गफरू रंगरेज नामक भोंदूबाबाने अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.             याबाबत माहिती अशी की, इगतपुरी, कोपरगाव येथील गरीब कुटुंबातील बालिका तिच्या आईसमवेत भोंदूबाबा  नुरोद्दिन गफूरकडे उपचारासाठी आली होती. उपचाराचे नाव सांगून बाबाने बालिकेसोबत गैरवर्तन केल्याची तक्रार देण्यासाठी बालिकेची आई व बालिका पोलीस ठाण्यात आली. मात्र, […]