गुरुवार, दि. 26 डिसेंबर 2019 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहणाचा नजारा सौदी अरेबिया, दक्षिण भारत, उत्तर श्रीलंका आणि इंडोनेशिया आदी ठिकाणी पाहण्याची सुवर्णसंधी निसर्गाने पृथ्वीवासीयांना उपलब्ध करून दिेलेली आहे. आशियाचा बराचसा भाग, भारताचा बहुसंख्य भाग व उत्तर ऑस्ट्रेलिया येथून मात्र खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण निश्चितच पाहणे, हा एक विलोभनीय आनंद तर आहेच; परंतु यानिमित्ताने ग्रहणाबद्दल […]
लेखक: arc_admin
उच्छाद मांडलाय गव्यांनी सर्वत्रत्यांची दहशत आहे प्रचंड लोक आता रानावनात जात नाहीत गावाबाहेर, घराबाहेर पडत नाहीत शेतावर जायचं कधीच सोडलंय त्यांनी आणि हातातोंडाशी आलेली ही पिकं फस्त करून टाकलीत गव्यांनी कळत नाही, कुठून, कसे अचानक येतात हे हिंस्र गव्यांचे कळप गावागावात घुसतात आणि कशी करतात चाल कोणाच्याही अंगावर त्यांचा नाही नेम नसतो कळप नेहमी शिंगे […]
कुणी कुणाला एक साधे पत्र लिहिले तरी कुणीही गुन्हेगार ठरु शकतो या देशात डेंजरझोनमध्ये उभा आहे देश, मी आणि तुम्हीसुद्धा… तुम्ही बोलायचे नाही धोरणांवर उपस्थित करायचे नाहीत प्रश्न विकासावर. पाशवी बहुमतासोबत नसाल तर उद्या तुम्हीही गुन्हेगारच असाल. तुमचा ऐकला जाणार नाही आवाज. दाबले जातील पद्धतशीरपणे विरोधाचे सूर. अराजक आता फार असणार नाही दूर चिरडून टाकले […]
“सारे धर्मग्रंथ वाचले पानं चाळताना फक्त एवढीच चूक झाली बोटाला जिभेवर न्यावं लागलं मी धर्माला थुक्का लावला आणि मी माणूस झालो. दिवाळीला घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली मला लोकं हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात म्हणून मी सगळं घरच पांढरंशुभ्र केलं मी जातीला चुना लावला आणि मी माणसात आलो.”
मासिक आणि मानसिक पाळी
“दीदीला पदर आला,” असं आई बाबांना म्हणाली दीदीने बाबांकडे पाहिलं, बाबांनी दिदीकडे पाहिलं दीदीची निरागसता अगदी तशीच… पण बाबांच्या चेहर्यावर काळजी. कायम उघडी असणारी घराची एक खिडकी बाबांनी आज कायमची बंद केली दीदीला कळलंच नाही तिच्या मनात एकच प्रश्न खि.ड.की. बंद का…?
मी अंधारात घुसणार तेवढ्यात उजेड पाय आपटून – आपटून रडू लागला म्हणाला, नको ना जाऊ. मी म्हटलं का? तो म्हणाला, अंधारात भुतं असतात. मी त्याचं बोट धरलं आणि चल म्हटलं आम्ही पुढे जाऊ तसं अंधार नाहीसा होत गेला आणि माणसं दिसू लागली…. ‘देवाने माणूस तयार केला की, माणसाने देव निर्माण केला?’ असं काहीसं मी परवा […]
फुलते त्या प्रत्येकीचे पवित्र निर्माल्यच होईल अशी खात्री देता येत नाही. उमलू न दिलेल्या कित्येक कळ्यांना निर्माल्य हे तर वरदान ठरते बहुधा. बाकी ज्याने ज्याकडे जसे पाहावे तसे ते त्याला दिसते, हा एक जबरदस्त दिलासाच म्हणायचा, शोषक – शोषित दोघांनाही ! त्याग, कृतार्थता, जीवनार्थ तर बरेचदा असते संस्कृतीची निव्वळ सारवासारव. कळ्यांनी कसे कुठे किती फुलावे, […]
स्त्री धर्म
आई गं तू आंदण म्हणून दिलेला तुझा धर्म मी झाकून ठेवलाय दिवा नसलेल्या अंधाराच्या गाभार्यात कारण विस्फारलेली त्याची नजर माझ्या स्वातंत्र्याच्या आडवी येते. म्हणून मी आज धर्मालाच झाकून ठेवलंय… आजही नजरेतले बाण काही बदललेले नाहीत त्याच्या पायातलं वहाण आणि विषयांची भोक्ती म्हणून आजही तो माझ्याकडे तसाच पाहतोय आणि सोशिकतेची मूर्ती ठरवून पुन्हा एकदा पतिव्रतेवर बलात्कार […]
महापूर ओसरल्यानंतर…
सांगली-कोल्हापूर येथे आलेला महापूर आता ओसरला आहे. या महापुराने केलेल्या नुकसानीचे तपशील सामोरे येत आहेत, तसेच घरांची पडझड, दैनंदिन उपयोगी वस्तूंचे झालेले नुकसान प्रचंड आहे; पण त्याचबरोबर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत ज्याप्रमाणे समाजातून मदतीचे हजारो हात तत्परतेने पुढे येतात, त्याप्रमाणे ते आले. परंतु तेवढी तत्परता, नियोजनबद्धता, संवेदनशीलता ‘एनडीआरएफ’चे मदतकार्य सोडता सरकारी पातळीवर मात्र अजिबात अनुभवायला आलेली […]
निर्भय
‘निर्भय’ हे उमेश मुरलीधर सूर्यवंशी यांनी लिहिलेले पुस्तक; नुकतेच ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध झाले. सूर्यवंशी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृतिशील कार्यकर्ते. ‘अंनिवा’चे सहसंपादक म्हणून त्यांनी तीन वर्षेजबाबदारी पेलली. लाख मराठा मोर्चाचाही त्यांना अनुभव आहे. गेल्या वर्षी राजर्षी शाहूंचा परिचय करून देणारे ‘राजर्षी’ पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले. त्याच्या दहा हजार प्रती संपल्या […]