Categories
पुस्तक परिचय

ओह माय गोडसे

ऑक्टोबर - २०१९

माणसाच्या पिल्लाच्या तोंडी प्रेमाची भाषा पेरणार्‍यांना सविनय अर्पण केलेली ‘ओह माय गोडसे’ ही विनायक होगाडे यांची कादंबरी. विनायक होगाडे राष्ट्र सेवादलाचे युवक कार्यकर्ते. सेवादलाच्या अनेक शिबिरात त्यांनी झांज आणि लेझीमपासून पथनाट्य आणि गाण्यापर्यंत अनेक विषयांची प्रशिक्षणे दिली आहेत. सेवादलाचाच समतेचा विचार सांगणार्‍या अंनिसच्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा सनातन्यांनी खून पाडला; त्यानंतर होगाडे अंनिसचे कार्यकर्ते बनले. ‘सॉक्रेटीस […]

Categories
पुस्तक परिचय

गांधीजी

ऑक्टोबर - २०१९

‘गांधीजी’ – हे नुकतेच दादा पुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेलं प्रा. आनंद मेणसे यांचे पुस्तक. कॉ. पुरव तारुण्यात पदार्पण करण्यापूर्वीच ‘लोकसेना’ या हिटलरच्या फॅसिझमविरोधी आणि देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी धडपडणार्‍या तरुणांच्या संघटनेत सामील झाले. स्वातंत्र्यानंतर ते बँक कर्मचारी बनले. त्यांच्या ए. आय. बी. इ. ए. या संघटनेचे असि. सेक्रेटरी बनले. अन्नपूर्णा महिला मंडळाच्या माध्यमातून […]

Categories
प्रासंगिक

संकष्टी, करवा चौथ आणि चांद्रमोहीम

ऑक्टोबर - २०१९

दि. 22 जुलै 2019 रोजी दु. 2.43 मिनिटांनी ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या प्रक्षेपकाद्वारे तब्बल 9 अब्ज 80 कोटी खर्चाच्या ‘चांद्रयान-2’ चे प्रक्षेपण आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून यशस्वीपणे झाले आणि तमाम भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून गेलेला होता. चंद्रावर बग्गी उतरवणारा अमेरिका, रशिया आणि चीन नंतरचा ‘चौथा देश’ अशी बिरूदावली लावून घेण्याच्या अनुषंगाने […]

Categories
फसवे विज्ञान

केंद्रिय शिक्षणमंत्र्यांची डिजिटल अंधश्रद्धा

ऑक्टोबर - २०१९

भारत सरकारच्या मानव संसाधन (एच. आर. डी.) मंत्रालयाच्या वेबसाईटवर उच्च शिक्षणाच्या सर्व संस्थांनी भारतात नवज्ञानाच्या निर्मितीवर भर द्यावा व विद्यार्थी संशोधनाचा भुकेला व नव संकल्पनांचा निर्माता व्हावा या अनुषंगाने भारतातील शिक्षणाची दिशा असावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे व ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019’ च्या पहिल्याच पानावर ‘भारताचे शैक्षणिक धोरण हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने व्हावे व […]

Categories
युवा मानस

ईगो : जनातला आणि मनातला

ऑक्टोबर - २०१९

मानसशास्त्रातील काही संज्ञा आपल्या बोलीभाषेत चांगल्याच रुजल्या आहेत. बोलीभाषेत रुजण्याचे भाग्य ज्या थोड्याबहुत मानसशास्त्रीय संज्ञांना लाभले आहे, त्यात ईगोचा नंबर फार वरचा लागेल. आपल्या दैनंदिन वापरात अनेक वेळा ‘ईगो’ येतो. ‘त्याला जरा ईगोचा प्रॉब्लेम आहे’, ‘अमक्या-तमक्याच ईगो खूप स्ट्राँग आहे’ अशी वाक्ये आपण बोलताना सहजी वापरतो. इथे आपण ‘ईगो’ हा शब्द ‘अहंभाव’ अशा अर्थाने वापरतो. […]

Categories
बुवाबाजी

नांदेड जिल्ह्यात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार – मुलांचे हात घातले उकळत्या तेलात

ऑक्टोबर - २०१९

महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात येऊन सहा वर्षेपूर्ण झाली, तरीही या कायद्याबाबत प्रशासनातील बरेच पोलीस व न्यायपालिकेतील वकील अनभिज्ञ असल्याचे नांदेड येथील एका घटनेतून अनुभवास आले. विशेष म्हणजे या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत नांदेड चर्चेत होते. कारण या कायद्यांतर्गत पहिला गुन्हा; तोही मुस्लिम बाबाचा नांदेड येथे नोंदविण्यात आला आहे. या […]

Categories
नवी अंधश्रद्धा

लाल रंगाच्या बाटलीला कुत्री घाबरतात?

ऑक्टोबर - २०१९

महाराष्ट्रभर ठिकठिकाणी घराच्या अंगणात लाल रंगाचे पाणी भरून ठेवलेल्या प्लास्टिक बाटल्या दिसतात. आता या बाटल्या कशाच्या, असा सुुरुवातीला नवागतांना प्रश्न पडायचा. मात्र आता हे लोण सार्वत्रिक झाले असून तो कुत्र्यांचा ‘बंदोबस्त’ असल्याचे सांगण्यात येते. म्हणजे भटकी कुत्री दारात ‘शी’ करत असतील, तर हा नामी उपाय असल्याचे सांगितले जाते. दाराशी लाल रंगाच्या पाण्याची बाटली ठेवल्यास कुत्री […]

Categories
हात मदतीचा

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आघाडीवर

ऑक्टोबर - २०१९

सांगली अंनिस सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये कृष्णा व पंचगंगा नदीला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महापूर आल्यामुळे नदीकडील गावांचे प्रचंड नुकसान झाले. घरे, शेती पाण्याखाली गेली. या नैसर्गिक आपत्तीमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी देशभरातील सामाजिक संस्था पुढे आल्या. सामाजिक संस्थांनी पूरग्रस्तांना लागणारे दैनंदिन सामान जसे – धान्य, कपडे, किराणा माल इत्यादींची मोठ्या प्रमाणात मदत केली. परंतु विद्यार्थ्यांच्या […]

Categories
पूर आणि विज्ञान

महाराष्ट्रातील पूरनियमनाची संकल्पना आणि व्यवस्था

ऑक्टोबर - २०१९

सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील महापुराच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पूरनियमनाची संकल्पना आणि व्यवस्था याबाबत या लेखात अभियांत्रिकी व व्यवस्थापकीय अंगाने काही मुद्दे मांडले आहेत. महाराष्ट्रातील पूरप्रवण क्षेत्रे : (राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 7 टक्के) क्षेत्रेनदी मुंबई, ठाणे मिठी महाड, नागोठणे, सावित्री, अंबा, वासिष्ठी, उल्हास पेण, चिपळूण सांगली व कोल्हापूर कृष्णा, पंचगंगा, वारणा पुणे मुळा, मुठा पंढरपूर […]

Categories
व्यक्तिविशेष

प्रा. विठ्ठल बन्ने : सामाजिक चळवळीचे दिशादर्शक व्यक्तिमत्त्व

ऑक्टोबर - २०१९

गडहिंग्लज नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, देवदासी चळवळीचे शिल्पकार आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. विठ्ठल सिद्धाप्पा बन्ने यांचे रविवार, दि. 18 ऑगस्ट 2019 रोजी वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. देवदासीसारखी अनिष्ट प्रथा निर्मूलनासाठी उभारलेल्या चळवळीत ते नेहमी अग्रेसर राहिले. 1975 मध्ये ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, प्रा. सुभाष जोशी, सुरेश शिपूरकर, बापू म्हेत्री यांच्या उपस्थितीत देशातील […]