Categories
चिकित्सा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा आगळिका आणि घोडचुका

ऑक्टोबर - २०१९

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा (2019)’ नुकताच प्रकाशित झाला. भारतीय इतिहासाबाबतच्या एका विशिष्ट दृष्टिकोनावर हा मसुदा आधारलेला आहे. ‘नालंदा, तक्षशीला यासारखी विद्यापीठे आपल्याकडे होती, म्हणजेच आपल्या शिक्षणव्यवस्थेचा इतिहास जाज्वल्य आहे आणि त्याचे पुनरुज्जीवन केले पाहिजे,’ असा हा दृष्टिकोन आहे; परंतु ‘बहुजन समाजाला, तसेच स्त्रियांना, साक्षरतेचा आणि शिक्षणाचा हक्क आपल्या शिक्षणव्यवस्थेने नाकारला होता,’ याकडे हा दृष्टिकोन कानाडोळा […]

Categories
संविधान

संविधान, निवडणुका आणि वास्तव

ऑक्टोबर - २०१९

‘या, आपण सारी माणसं, एकमेकांचा आदर करूया, एकत्र राहूया, एकत्र विचार करूया, एकत्र काम करूया, सुख-दुःख वाटून घेऊया, एकमेकांचा आधार बनूया, यातून हे आयुष्य, जग अधिक सुंदर आणि आनंदी करूया.’ असा विचार ही मानवी समाजाची निरोगी आणि निकोप प्रेरणा आहे. यासाठी हजारो वर्षे माणूस प्रयत्नशील राहिला आहे. या प्रयत्नांच्या आड येणार्‍या माणसांच्या किंवा समूहाच्या वैयक्तिक […]

Categories
संतविचार

संतांची विवेकी दिवाळी…

ऑक्टोबर - २०१९

मी अविवेकाचि काजळी । फेडोनि विवेक दीप उजळी । ते योगिया पाहे दिवाळी । निरंतर ॥ देशात मंदीच्या झळा सामान्य नागरिकांना जाणावू लागल्या आहेत. राज्यात काही भागात या वर्षी आलेल्या महापुराने ही दाहकता अधिकच अधोरेखित होत आहे. अर्थात महापुराचे संकटही नैसर्गिक होते की अविवेकी वागण्याचा तो परिणाम होता, यावरही आता चर्चा सुरू आहे आणि त्यात […]

Categories
बुवाबाजी

सातार्‍यातील ज्योतिषाला एक महिन्याची शिक्षा

ऑक्टोबर - २०१९

भानामती, भूत, हडळ, मुलगाच होईल, मुलगी होणार नाही, अशा भूलथापा मारून लोकांकडून पैसे उकळणार्‍या विश्वास भालचंद्र दाते (रा. जोशीवाडा, यादोगोपाळ पेठ, सातारा) या ज्योतिषाला मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कस्तुरे यांनी एक महिना सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड; दंड न दिल्यास सात दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी ः ज्योतिषी […]

Categories
अंधश्रद्धा

शाळकरी मुलीच्या मृत्यूनंतर जळगाव अंनिसने उतरवले नागरिकांच्या मनातील ‘भूत’

ऑक्टोबर - २०१९

भूतबाधा झाल्याच्या संशयावरून कजगाव (ता. भडगाव) येथील 14 वर्षीय शाळकरी मुलीस कनाशी येथील एका मंदिरात उपचारासाठी नेले होते. याच परिसरात संबंधित मुलीने विजेच्या खांबावर चढून उडी घेतल्याने तिचा जीव गेला. मुलीच्या अंगात असलेल्या भुताने जीव घेतल्याचा समाज नागरिकांनी करून घेतला होता. दरम्यान, या घटनेची चौकशी करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी शनिवारी, 14 सप्टेंबर रोजी कजगाव […]

Categories
चळवळ

विवेक जागर करंडक पथनाट्य स्पर्धा आणि ‘विवेकी’ तरुणाई

ऑक्टोबर - २०१९

महा. अंनिस शाखा पनवेल व पनवेल शहर ‘विवेकवाहिनी’तर्फे दि. 18 ऑगस्ट 19 रोजी ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या विषयावर आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धा घेण्यात आली. डॉ. दाभोलकरांच्या खुनाला 6 वर्षेझाली आहेत, तरीही अजून सूत्रधार सापडलेले नाहीत. देशात मात्र हिंसाचाराच्या घटना वाढतच आहेत. अशा पार्श्वभूमीवर तरुणाईची भूमिका सांस्कृतिक अंगाने समजून घेण्याचा हा प्रयत्न होता. रायगड, […]

Categories
पुस्तक परिचय

रिचर्ड डॉकिन्सच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करताना…

ऑक्टोबर - २०१९

जादूई वास्तव या पुस्तकातील मनोगताचा संपादित अंश अंनिसच्या त्रिदशवार्षिक परिषदेत माझे पुस्तक प्रकाशित होत आहे याचा आनंद काही खास आहे. रिचर्ड डॉकिंन्सचं, ‘द मॅजिक ऑफ रियॅलिटी’ हे पुस्तक मी वाचलं आणि थक्क झालो. वाचल्यावाचल्याच याचा अनुवाद करायचं मी मनोमन ठरवलं. आज ‘जादूई वास्तव’च्या रूपाने हा भावानुवाद आपल्या हाती देत आहे. विज्ञानाच्या सृष्टीबद्दल विस्मयकारी माहिती देणारी […]

Categories
निवेदन

व्यसनमुक्त महाराष्ट्र करण्याचे वचन जाहिरनाम्यात द्या!

ऑक्टोबर - २०१९

व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच राज्य भरातील अनेक संस्था संघटनांचा समन्वय मंच म्हणून गठीत करण्यात आला आहे. वाढत्या व्यसनांची दाहकता लक्षात घेता गेल्या पाच हिवाळी व पावसाळी अधिवेशनांदरम्यान आम्ही राज्य व्यसनमुक्त करण्याच्या बद्दल आग्रही मागणी सनदशीर मार्गाने करीत आहोत. राज्याच्या निर्मितीला 60 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने 2020 नंतरचा महाराष्ट्र कसा […]

Categories
अभिवादन

साथी गिरीशभाई शाह : मूर्तिमंत प्रेरणा आणि बांधिलकी!

ऑक्टोबर - २०१९

अंनिसचे काम तळमळीने करणारे, निर्गवी, सहृदय, दानशूर, कार्यतत्पर, विनम्र, इतर समविचारीनाही मदत करणारे, प्रसिद्धीपासून दूर रहाणारे, पर्यावरणवादी अशी स्वभाव वैशिष्ट्ये असणारे मुंबई जिल्हा अंनिसचे अध्यक्ष आदरणीय गिरीशभाई शहा यांचे दि. 25 सप्टेंबर 2019 रोजी मुंबई येथे निधन झाले. गिरीशभाई ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असतानाही ते सांगली–कोल्हापूर येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत पाठवायचे नियोजन करत होते. तिथे डॉक्टर […]

Categories
संपादकीय

अंनिसची त्रिदशकपूर्ती आणि जवाब दो…

सप्टेंबर- २०१९

जुलै अखेरपासून मुंबईत आणि राज्यातील इतर भागात सुरू झालेला पाऊस आणि त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा भागात उद्भवलेल्या भयानक पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर 9, 10, 11 ऑगस्ट रोजी संघटनेच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त मुंबईतील मुलुंड येथील ‘महाकवी कालिदास नाट्यगृहा’त आयोजित केलेली एक दिवसाची ‘मानवतेसाठी विवेकवाद’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आणि दोन दिवसाचे अधिवेशन राज्यातील 35 जिल्ह्यांतून व देशातील 15 राज्यांतून मोठ्या […]