Categories
उपक्रम

उत्तरकार्याला पुस्तक वाटप

ऑक्टोबर - २०१८

गुरुवार दि. 5 सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथील प्राचार्य डॉ. विलासराव पोवार यांचे वडील शंकर केदारी पोवार यांचे 102 व्या वर्षी दु:खद निधन झाले. पोवार परिवाराने उत्तरकार्य प्रसंगी जमलेल्या मित्र, नातेवाईकांना, ‘विवेकी कवयित्री बहिणाबाई चौधरी’ या पुस्तिकेचे वाटप केले.पतीच्या निधनानंतर हातपाय गाळून न बसता, बुवा-बाबाच्या मागे न लागता किंवा आत्महत्येसारखे आततायी पाऊल न उचलता, बहिणाबाईंनी यशस्वीपणे तोंड दिले. त्यांचे जीवन प्रेरणादायी आहे. प्रा. डॉ. छाया पोवार यांनी लिहिलेले हे पुस्तक त्यांनी ‘अंनिवा’ मध्ये प्रसिद्ध केलेल्या लेखावर आधारित आहे.