Categories
बालविभाग

सामान्यज्ञान चाचणी

वार्षिकांक - २०१५

मुलांनो – आकाशगंगापासून ते सूक्ष्म जीवाणूपर्यंत विज्ञान विश्वाचा पसारा आहे. विज्ञानातील सत्ये हरघडी आपल्या जीवनाशी जोडलेली असतात. त्याचे सामान्यज्ञान तुम्हाला हवेच. तुम्ही भविष्यात मोठे सनदी अधिकारी किंवा जबाबदार नागरिक होणार आहात. मग करा पाहू तुमच्या सामान्य ज्ञानाची चाचणी.

1) त्वचेला आणि केसांना रंग आणणारे द्रव्य कोणते?

2) पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात 500 हाडे असतात खरे की खोटे?

3) नखे कोणत्या द्रव्यापासून बनतात?

4) शरीराचा सर्वांत मोठा अवयव कोणता?

5) सूर्याला जवळचा ग्रह कोणता?

6) लाल ग्रहाचे नाव काय?

7) ‘नासा’ने अंतराळात सोडलेली संशोधन दुर्बिण कोणती?

8) अंतराळात सोडलेला पहिला उपग्रह कोणता?

9) नेहमीच्या रूम तापमानाला द्रव अवस्थेत असणारे मौल कोणते?

10) हवेतील श्वासावाटे आत घेतला जाणारा प्रमुख वायू कोणता?

11) खरे की खोटे? बॅटरीमध्ये रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते

12) विद्युत क्षेत्र ही संकल्पना प्रथम आईन्स्टाईनने मांडली.

13) विद्युत शक्ती(पॉवर) कोणत्या युनिटमध्ये मोजली जाते?

14) खरे की खोटे? हवेपेक्षा पाण्यात ध्वनीचा वेग जास्त असतो.

15) शुद्ध पाण्याचा पी.एच.कितीच्या आसपास असतो?

16) पृथ्वीवरील सर्वांत लांब नदी कोणती?

17) खरे की खोटे? हिंदी महासागर हा जगातील सर्वात मोठा समुद्र होय?

18) खरे की खोटे? बर्फ पाण्यात बुडतो.

19) जगातील सर्वात जास्त केळीचे उत्पादन घेणारा देश कोणता?

20) पृथ्वीवरील सर्वांत मोठा पर्वत कोणता?

21) पृथ्वीला जवळचा तारा कोणता?

22) खरे की खोटे? बेडूक हा थंड रक्ताचा प्राणी होय

23) ज्वालामुखीतून बाहेर पडणार्‍या वितळलेल्या खडकांचे नाव काय?

24) खरे की खोटे? पृथ्वीवरील सर्वांत वेगवान प्राणी झेब्रा होय.

25) He हे चिन्ह असलेले रासायनिक मौल कोणते?

योग्य पर्याय निवडा.

(26) लेसर प्रिंटरमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचे लेसर वापरतात?

(A) सेमी कंडक्टर लेसर (B) डाय लेसर (C) गॅस लेस

(27) एल.पी.जी.गॅस हे खालील द्रव्यांचे मिश्रण आहे.

(A) मिथेन आणि ब्युटेन (B) प्रोमेन आणि ब्युटेन (C)इथेन आणि ब्युटेन

(28) उष्णता दिल्यावर खालीलपैकी कोणत्या पदार्थांचे संप्लवन होते?

(A)सल्फर (B) बर्फ (C)आयोडीन

(29)अँटीबायोटिक म्हणून वापरले जाणारे पेनिसिलिन कशापासून मिळते?

(A)बॅक्टेरिया (B)बुरशी (C)शेवाळ

(30) सेमी कंडक्टर (अर्धवाहक) बनविण्यासाठी कोणता धातू वापरतात.

(A)तांबे (B)पारा (C)सिलिकॉन

(31) समुद्राची खोली मोजणार्‍या उपकरणाचे नाव

(A)लेसर (B)रडार (C)सोनर

(32) ध्वनीची तीव्रता या युनिटमध्ये मोजतात.

(A)रिश्टर (B)मीटर (C)डेसिबल

(33) प्रकाश वर्ष (लाईट इअर) या युनिटद्वारा खालीलपैकी कोणती अंतरे मोजतात?

(A) दोन ग्रहामधील (B) पृथ्वीवरील दोन शहरामधील (C) दोन तार्‍यामधील.

(34) चंद्रावरून आकाश पाहिले तर ते कसे दिसेल?

(A)निळे (B)नारिंगी (C)काळे

(35) चंद्रावर उतरलेला पहिला माणूस——

(A) युरी गागारीन (B) नील आर्मस्ट्राँग (C) हबल

(36) लिंबू आणि संत्र्यात कोणते प्रमुख अ‍ॅसिड असते?

(A)सल्फ्युरिक अ‍ॅसिड (B)हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड (C)सायट्रिक अ‍ॅसिड

(37) मतदान करताना बोटाला लावलेल्या शाईत कोणते द्रव्य असते?

(A)सोडियम नायट्रेट (B)आयोडीन (C)सिल्व्हर नायट्रेट

(38) टेलिव्हिजन शोध कोणी लावला?

(A)न्यूटन (B)फ्लेमिंग (C)जे.एल.बेअर्ड

(39) कांदा आणि लसूण यांचा वास कोणत्या द्रव्यामुळे?

(A)सोडियम (B)क्लोरिन (C)पोटॅशियम

(40) सूर्यप्रकाश पृथ्वीवर किती वेळात पोचतो?

(A)वीस मिनिटे (B)तीस मिनिटे (C)आठ मिनिटे

ः उत्तरे :-

1) मेलॅनिन 2) खोटे-206 3) कोरॅटीन 4) त्वचा 5) बुध 6) मंगळ 7) हबल स्पेस दुर्बिण 8) स्पुटनिक 9) पारा 10) नायट्रोजन 11) खरे 12) खोटे – फॅरेडेने 13) वॅट 14) खरे 15) 7 च्या आसपास 16) नाईल नदी 17) चूक – पॅसिफिक 18) खोटे – तरंगते 19) भारत 20) एव्हरेस्ट 21) सूर्य 22) बरोबर 23) लाव्हा 24) चूक-चित्ता 25) हेलियम 26) (A) 27) (B) 28) (C) 29) (B) 30) (C) 31) (C) 32) (C) 33) (C) 34) (C) 35) (B) 36) (C) 37)(C) 38)(C) 39)(C) 40)(C)