Categories
उपक्रम

स्मशानभूमीत मुलीचा वाढदिवस साजरा

ऑक्टोबर – २०१७

सामान्य माणसांची भूताविषयीची भीती घालविण्यासाठी मअंनिस, बिलोली (जि.नांदेड) शाखेचे प्रधान सचिव कमलाकर जमदाडे हे बिलोली तालुक्यापासून सद्रापूर या खेड्यामध्ये राहतात, त्यांनी आपल्या चार वर्षांची मुलगी क्षितिजा हिचा वाढदिवस बिलोली या तालुक्याच्या ठिकाणी स्मशानभूमीत करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी बिलोली येथील नगरपालिकेच्या सार्वजनिक स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी नगरपालिका, पोलीस प्रशासन व तहसीलदार यांची रीतसर परवानगी घेतली. सर्व नातेवाईक, प्रतिष्ठित नागरिक व अंनिसच्या जिल्हा कार्यकारिणीस आमंत्रित केले. स्मशानभूमीत टेन्ट टाकून मुलीचा वाढदिवस साजरा केला.

या प्रसंगी अंनिस, बिलोली शाखेचे अशोक वाघमारे, एन. जी. वाघमोडे, बार्टीचे समतादूत मामीडवार, सविता कांबळे, पंचशिला देवक रे, नगराध्यक्ष उत्तमराव जेढे, भीमराव जेढे, राजेंद्र कांबळे, पत्रकार व मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अंनिस नांदेडचे प्रधान सचिव यांनी भूत व भूतबाधा या विषयी मांडणी केली, तर बिलोली शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड. धोंडिबा पवार यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चतु:सूत्री व कार्य सांगितले.

सम्राट हटकर, नांदेड