Categories
विज्ञान व्यक्तिविशेष

सफाई कामगार बनला विज्ञान खेळण्याचा शिक्षक

राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त विशेष लेख!
फेब्रुवारी – २०१४

मायकल फॅरेडे हा लोहाराचा मुलगा. सर हंप्री डेव्ही या प्रख्यात शास्त्रज्ञाच्या प्रयोगशाळेत बाटल्या धुण्याचे काम करता करता तो एक महान वैज्ञानिक बनला. इलेक्ट्रीक मोटर व जनरेटर यांच्या भौतिक तत्त्वाचा हा निर्माता.

जिज्ञासा व प्रतिभा असेल तर दारिद्य्र आड येत नाही हेच खरे. आयुका(पुणे) या संस्थेतील अरविंद गुप्ता यांनी आपल्या सफाई कामगारामध्ये अशी प्रतिभा हेरली व त्यास विज्ञान शिकण्याचे व शिकविण्याचे प्रोत्साहन दिले. यातून शिवाजी माने हा सफाई कामगार बनला विज्ञान खेळण्याचा शिक्षक.

शिवाजी माने. वय वर्षं सव्वीस. शाळेची पायरी सातवीपर्यंत चढलेला तरुण. त्याला बिकट परिस्थितीमुळे सातवीपुढे शिक्षण घेता आलं नाही. अपुर्‍या शिक्षणामुळे, त्याच्या आयुष्याची नौका काही काळ भरकटली. तो गरिबीमुळे मोलमजुरी करत असे. शिवाजी कामाच्या शोधार्थ पुण्यातल्याच आयुकापर्यंत पोचला आणि तिथंच त्याच्या आयुष्याला दिशा मिळाली. त्यानं सफाई करता करता आयुकामध्ये विज्ञानखेळणी तयार करण्याचं कसब आत्मसात केलं आणि त्याचा परिणाम असा, की आज निरनिराळ्या शाळा स्वतःहून, आनंदानं त्याला बोलावत आहेत. शिवाजी गावोगावच्या, ठिकठिकाणच्या शाळांतील मुलांना विज्ञानखेळणी तयार करायला शिकवत आहे. शिवाजीच्या घरचा चप्पलदुरुस्तीचा व्यावसाय. तेथपासून सफाई कामगार आणि आज विज्ञानखेळण्यांचा प्रशिक्षक येथपर्यंतचा त्याचा प्रवास रोमहर्षक आहे.

शिवाजीचं लहानपण लातूरच्या चाकोर तालुक्यातील जडाळा नावाच्या गावात गेलं. चर्मकार हा वडिलोपार्जित व्यवसाय. त्यांच्या घरी स्लिपर तयार करण्याचं मशीन होतं. पण घरच्या व्यवसायात नुकसान झालं, मशीन विकावं लागलं. वडील कर्जाच्या ओझ्याखाली आले. चार भाऊ, एक बहीण, आईवडील अशा मोठ्या कुटुंबाचा भार एकट्या वडिलांवर पडू लागला. शेजारच्या एकानं केरळमध्ये बुढ्ढी के बाल, सोनपापडी तयार करण्याच्या कारखान्यात मुलांना काम दिलेला असल्यानं त्यांना पहाटेपासून रात्रीपर्यंत राबवून घेण्यात येई. दोघे भाऊ आपण घरासाठी राबतोय या भावनेनं आनंदानं कष्ट उपसत होते. शिवाजी केरळहून परतताना आंध्रप्रदेशमध्ये कापसाच्या मिलमध्ये कापूस आणि बिया गोळा करण्याचं काम मिळवण्यासाठी हैदराबादला उतरला. कामगारांची भरती आधीच झाली होती! पुढे पुण्याला जाण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्याने आठ दिवस राबून पैसे जमवले आणि एका ट्रकवाल्याच्या मदतीनं पुण्यापर्यंतचा प्रवास केला. त्यानं पुण्याला एका सिक्युरिटी एजन्सीत नोकरी पत्करली. मग एके ठिकाणी वेटरचं काम केलं. तिथं स्वयंपाक शिकल्यानंतर अ‍ॅल्युमिनेशन फॅक्टरीत स्वयंपाक्याचं काम केलं. त्यानंतर पुण्यातील सांगवी परिसरात एका चौकात हातगाडी लावून चप्पलविक्रीचा व्यवसाय करू लागला. त्यानंतर तो आयुकामध्ये सफाईकामगार म्हणून कामास लागला. शिवाजी आयुकामध्ये रमू लागला. ‘मुक्तांगण विज्ञानशोधिके’ची विज्ञानखेळणी बनवण्याची खोली त्याला आकर्षित करत असे. त्याची चौकस वृत्ती त्याला शांत बसू देत नव्हती. तो त्या विभागाचे केंद्रप्रमुख अरविंद गुप्ता, त्यांचे सहकारी विदुला म्हैसकर, अशोक रूपनेर, ज्योती हिरेमठ यांचे खेळणी बनवण्याचं काम पाहू लागला. पडक्या, फुटक्या, कचर्‍यात टाकलेल्या वस्तूंपासून ही विज्ञाननगरी उभी राहिली याचं त्याला आश्चर्य वाटायचं! त्यानं स्वत: विज्ञानखेळणी तयार करण्यास सुरुवात केली. देतो असे सांगितलं. त्यानं एका मुलासाठी वर्षाला पाच हजार रुपये देण्याची कबुली दिली. शिवाजीनं नुकतीच सातवीची परीक्षा दिली होती. शिवाजी आणि त्याचा भाऊ प्रकाश या दोघांची केरळला रवानगी झाली. दोघा भावांचा वर्षभराचा पगार आधीच दिलेला असल्यानं त्यांना पहाटेपासून रात्रीपर्यंत राबवून घेण्यात येई. दोघे भाऊ आपण घरासाठी राबतोय या भावनेनं आनंदानं कष्ट उपसत होते. शिवाजी केरळहून परतताना आंध्रप्रदेशमध्ये कापसाच्या मिलमध्ये कापूस आणि बिया गोळा करण्याचं काम मिळवण्यासाठी हैदराबादला उतरला. कामगारांची भरती आधीच झाली होती! पुढे पुण्याला जाण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्याने आठ दिवस राबून पैसे जमवले आणि एका ट्रकवाल्याच्या मदतीनं पुण्यापर्यंतचा प्रवास केला.

त्यानं पुण्याला एका सिक्युरिटी एजन्सीत नोकरी पत्करली. मग एके ठिकाणी वेटरचं काम केलं. तिथं स्वयंपाक शिकल्यानंतर अ‍ॅल्युमिनेशन फॅक्टरीत स्वयंपाक्याचं काम केलं. त्यानंतर पुण्यातील सांगवी परिसरात एका चौकात हातगाडी लावून चप्पलविक्रीचा व्यवसाय करू लागला. त्यानंतर तो आयुकामध्ये सफाईकामगार म्हणून कामास लागला. शिवाजी आयुकामध्ये रमू लागला. ‘मुक्तांगण विज्ञानशोधिके’ची विज्ञानखेळणी बनवण्याची खोली त्याला आकर्षित करत असे. त्याची चौकस वृत्ती त्याला शांत बसू देत नव्हती. तो त्या विभागाचे केंद्रप्रमुख अरविंद गुप्ता, त्यांचे सहकारी विदुला म्हैसकर, अशोक रूपनेर, ज्योती हिरेमठ यांचे खेळणी बनवण्याचं काम पाहू लागला. पडक्या, फुटक्या, कचर्‍यात टाकलेल्या वस्तूंपासून ही विज्ञाननगरी उभी राहिली याचं त्याला आश्चर्य वाटायचं! त्यानं स्वत: विज्ञानखेळणी तयार करण्यास सुरुवात केली. त्याला खेळण्यांचं विश्व भुलवू लागलं. अरविंद गुप्ता यांनी त्याच्या हातातील सर्जनशीलता ओळखली. त्यांनी शिवाजीला हे काम पूर्णवेळ करणार का, ग्रामीण भागात जाऊन प्रात्यक्षिकं द्यावी लागतील. यासाठी सहा हजार रुपये देतो, पण पूर्णवेळ यावं लागेल अशी विचारणा केली. शिवाजीला सहा हजार रुपये खूपच वाटले!

शिवाजी म्हणतो, हे सहा हजार रुपये वर्षांचे असावेत असा माझा समज झाला. यावर गुप्तासरांनी हा पगार दरमहा देणार असल्याचं सांगितले आणि माझ्या डोळ्यांत पाणीच आलं! माझ्यासारख्या सातवी पास मुलाला ही संधी देऊ केल्याबद्दल गुप्तासरांना काही जणांशी अक्षरशः भांडावं लागलं. शिवाजीला विज्ञानखेळण्यांच्या सान्निध्यात काम करतानाच शिक्षणाची गोडी लागली आणि त्याचं महत्त्व कळू लागलं. तो म्हणतो, मला फार चांगले गुरू लाभले आहेत. गणित आणि विज्ञानाचं शिक्षण नसताना विज्ञानखेळणी बनवणं आणि विज्ञानवाहिनीच्या सोबतीनं आठवड्यातून दोनदा महाराष्ट्राच्या विविध भागांतील शाळांत जाऊन विद्यार्थ्यांना विज्ञानखेळण्यांचं प्रशिक्षण देणं ही कामे शिवाजी करत आहे. त्याला विज्ञानातील अनेक नियम पक्के माहीत झाले आहेत.

शिवाजीची ज्या आयुकाच्या परिसराशी ओळख सफाईकामाच्या निमित्तानं झाली, त्याच आयुकानं शिवाजीला वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी दिली आणि त्यानं त्या संधीचे सोनं केलं! आयुकामध्ये शिवाजीला भेटायला गेलं, तर तो आनंदानं आपलं स्वागत करतो आणि आपल्याला त्याच्या खेळण्यांच्या जगात घेऊन जातो. आपल्यासमोर तुटक्या-फुटक्या वस्तूंपासून एखादं खेळणं झटकन तयार करून दाखवतानाचा त्याला होणारा आनंद शब्दातीत असतो. विज्ञानाच्या अनेक संकल्पना तो अशा सोप्या पद्धतीनं समजावतो, की जणू काही शाळेतल्या विज्ञानाच्या तासाची सफरच! मग एकदम तयार केलेली ती विज्ञानमयी वस्तू सहजासहजी मोडून तो, करून पाहणार का? असा प्रश्न करतो.

शिवाजीला भेटायला कधीही जा, असा अनुभव येणार यात शंकाच नाही. इंग्रजी भाषा येत नसली तरी तो इंग्रजी शाळेत आत्मविश्वासपूर्वक वावरतो. विज्ञानाच्या संकल्पना, परिभाषा इंग्रजीतून सांगून उर्वरित माहिती हिंदीतून देतो. पुढल्या वर्षी पुन्हा त्या शाळेत गेल्यावर सगळेच जण त्याला ओळखतात आणि मागील वर्षी काय काय शिकलो याची न विचारता उजळणी होते.

आयुकात शिवाजीला भेटायला गेल्यावर त्याचा संवाद खेळण्यांपासूनच सुरू होतो. निरनिराळे खेळ दाखवत विविध संकल्पना तो आपल्याला सांगू लागतो. लहान मुलांना खेळणी मोडून ती कशी तयार झाली आहेत हे पाहण्याची उत्सुकता असते.बाजारातली खेळणी मोडता येतात, मात्र पुन्हा जोडता येत नाहीत. विज्ञान खेळण्यांचं तसं नसतं. विज्ञानखेळणी सायकलची ट्यूब, सीडी, तुटलेली चप्पल, पाण्याच्या बाटल्या, कागद अशा घरातील ऐंशी टक्के टाकाऊ वस्तूंचा वापर करून बनवलेली असतात. त्यामुळे मुलांच्या जिज्ञासूवृत्तीसोबत त्यांच्या कल्पकतेलाही वाव मिळतो.

शिवाजीनं विज्ञानखेळण्यांचं प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातील बहुतेक गावे पालथी घातली आहेत. त्याचबरोबर त्यानं बंगलोर, गुजरात इथंही शिक्षकांना खेळणी तयार करण्याचं प्रशिक्षण दिले आहे. गुजरातमध्ये तर त्यानं तीन हजार मुलं आणि दोनशे शिक्षकांची कार्यशाळा घेतली होती!

शिवाजीनं आतापर्यंत महाराष्ट्रातील दीडशेहून अधिक शाळांना भेट दिली असून दोनशेपेक्षा जास्त कार्यशाळाही घेतल्या आहेत. अखिल भारतीय चर्मकार संघाकडून 2011 साली ‘संत रोहिदास पुरस्कार’ देऊन त्याचा गौरव करण्यात आला. याच वर्षी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्नी उमासोबत महर्षी कर्वे बचतगटाच्या मार्फत खेळणी बनवून विक्री करण्याचे काम शिवाजी करत आहे. त्याच्या लहानशा खोलीत खेळण्यांचा पसारा असतो. शिवाजी आणि त्याच्या कुटुंबाला हा पसाराच जास्त प्रिय वाटतो. खेळण्यांनी त्याचं आयुष्य घडवलं आहे.

न्यू्टनला ज्या सफरचंदाच्या झाडाखाली गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचं ज्ञान झालं त्या सफरचंदाच्या झाडाचं एक बीज आयुकात लावण्यात आलं आहे. त्याच आयुकाच्या सान्निध्यात आल्यावर विज्ञानापासून अनभिज्ञ असलेल्या शिवाजीला ते ज्ञान व्हावं आणि त्याच्या आयुष्याची निश्चित दिशा ठरून जावी हा न्यूटनच्या शोधाइतकाच योगायोग नाही का?

-हिनाकौसर खान

भ्रमणध्वनी : 9850308200,

शिवाजी माने भ्रमणध्वनी : 9922688039