डॉ.तृप्ती शहा या दुसरीत शिकणार्या अमेयच्या आई. एक सुजाण पालक म्हणून त्यांनी अमेयला अंधश्रद्धेच्या प्रभावापासून मुक्त करण्याचा विचार केला. याचाच भाग म्हणून शाळेच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत त्यांनी अमेयला चमत्काराचा पर्दाफाश करणार्या कार्यकर्त्याचा रोल दिला. या आगळ्या वेगळ्या रोलचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की, अमेयला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. अमेय व त्याची आई यांच्या या उपक्रमाचे शब्दांकन तृप्ती शहा यांच्याच शब्दात –संपादक
विबग्योर स्कूल, कोल्हापूर या शाळेमार्फत जिल्हास्तरीय आंतरशालेय फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित केल्या होत्या. माझा मुलगा अमेय आशिष शहा इयत्ता 2 री मध्ये शिकत आहे. त्याला या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची इच्छा होती. पण नेमका कोणता रोल करावा हा विचार अजून नक्की झाला नव्हता. आजकालची मुले स्पाईडरमॅन, सुपरमॅन असा रोल करणे पसंत करतात. पण माझी स्वत:ची अशी इच्छा होती की, काहीतरी वेगळे करावे की, ज्यायोगे प्रेक्षकांपर्यंत काहीतरी प्रबोधनात्मक संदेश जावा. आधी जोकर करावे व जीवन कसे हसत दुसर्यांसाठी जगावे, असे ठरवले पण ते पभावी वाटेना मग एक जंतर-मंतर करणार्या बाबांचा ड्रेस करायचे ठरवले. पण हे ब्लॅक मॅजिक करणारे लोक समाजातील स्त्रियांची-पुरूषांची दिशाभूल पण करतात म्हणून शेवटी एका समाजसेवकाचा रोल करून या दिशाभूल करणार्या बाबांचा प्रात्यक्षिक दाखवून पर्दाफाश करून सामाजिक प्रबोधनात्मक फॅन्सी ड्रेस करण्याचे नक्की केले.
त्याच्या ड्रेसचे मी स्वत: पेंटींग केले. Skull व femur हे बोन्स आणले. डायलॉग तयार केले पण प्रात्यक्षिक एवढा लहान मुलगा कसे सादर करणार?
मग प. रा. आर्डे यांच्यामार्फत आर.एस.कुलकर्णी व अनिल चव्हाण सर यांची ओळख झाली. त्यांनी या विषयाच्या सादरीकरणाबाबत खूप मोलाचे सहकार्य केले. माझ्या मुलाकडून जिभेत सुई खुपसणे व नारळ फोडून त्यातून चॉकलेट काढणे या प्रात्यक्षिकांची चांगली प्रॅक्टीस करवून घेतली की, ज्यायोगे तो अगदी सहजपणे कार्यक्रम सादर करू शकला.
जय हो बाबा की, जय हो बाबा की
I am a Supernatural Man. I have power. I can do anything which you cannot imagine. See, This is a needdle. I can pin this needdle through my tongue. (प्रात्यक्षिक करून दाखविले व टाळ्या पडल्या)
So kids, you came to know. How powerful I am?
Kids if you want to pass in exams without study then come to me. See this is coconut. Now I will break this coconut & see what will come from it.
Oh! Chocolates. Kids, if you will eat these chocolates then you will pass in exam without study. Okay. (नंतर वरचा जंतरमंतर बाबांचा ड्रेस काढला आतमध्ये समाजसेवकाचा साधा झबला-पायजमा घातलेला आहे.)
I am Social Worker Whatever you have heard & seen. just now is not true. All are tricks. Black Magician makes us fool to make money Please don`t believe such things.
Now I will distribute some pamphlets. Please read, it.
(Started distributing pamphlets in audience.) Thank You.
अशा प्रकारचे फॅन्सी ड्रेस सादरीकरण जेव्हा माझ्या मुलाने केले तेव्हा सर्व प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजराबरोबर माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले की, माझी इच्छा एवढ्याशा लहान वयातील माझ्या मुलाने पूर्ण केली व इतक्या लहान वयातच समाजसेवा व प्रबोधन करण्याचे संस्कार त्याच्यावर घडले. त्याच्याही आयुष्याला दिशा निर्माण झाली.
माझ्या मुलालाही खूप आनंद झाला. कारण त्याचे थोडे कौतुक झाले नव्हते. विबग्योर शाळेच्या शिक्षक व मुख्याध्यापकांनी पण या कल्पनेचे खूप कौतुक केले व अमेयचे खूप कौतुक केले.
माझ्या मुलाचा नंबर यावा अशी अपेक्षा नव्हती. कार्यक्रमामार्फत स्त्रियांमध्ये हे प्रबोधन झाले तरी बस्स अशा विचाराने मी ह्या विषयाची निवड केली होती. पण माझ्या अमेयला इंटरस्कूल फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये चक्क प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले.
– तृप्ती शहा
मुलांनो, तुम्हीसुद्धा अमेयप्रमाणे अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमांत सामील व्हा! – संपादक
अंधश्रद्धेमागचे विज्ञान
जगात घडणार्या प्रत्येक घटनेमागे कारण हे असतेच. पाऊस कसा पडतो? जंगलात वणवा का पेटतो? पूर्वी याचे वैज्ञानिक ज्ञान नव्हते पण आता त्याचा शोध लागला आहे. म्हणूनच समजले, की हे चमत्कार नसून त्याच्यामागे विज्ञान आहे.
मग प्रत्येक चमत्कारावर पूर्ण विश्वास ठेवायचा की चौकस बुद्धीने चमत्कारामागे विज्ञान आहे ही युक्ती हे बघायचे? *जिभेत सुई खुपसणे, * नारळातून पाणी काढणे, *हातातून भस्म काढणे. *जळका कापूर खाणे. *मंत्राने अग्नी पेटवणे. *विस्तवावरून चालणे. *भूताने झपाटणे. *खिळ्याच्या पाटावर झोपणे. *हवेत हात फिरवून सोन्याची साखळी काढणे.
हे सर्व खरे किती, खोटे किती? विचारवंत अब्राहम कोवूर म्हणतात की, “चमत्कारावर विश्वास ठेवणारा मूर्ख असतो, चमत्कार करणारा बदमाश असतो. चमत्काराला विरोध न करणारा भ्याड असतो.”
मम्मी-पप्पा, मला मूर्ख, बदमाश, भ्याड बनवायचे नाही. हीच आपली अपेक्षा आहे ना?
-आपला विज्ञानवादी मुलगा
अमेय शहा, ग्रेड-2, व्हिबग्यॉर स्कूल, कोल्हापूर