Categories
भानामती

 अन्… प्रबोधनाने भानामती थांबली

जून – २०१३

सिंदी मेघे येथील उमरी रोडवर असलेले मातृसेवा संघद्वारे संचलित मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध महिला-पुरूष घर व कुटुंबापासून दूर राहतात अनेकांचे वय झालेले तर काही 40 ते 50 या वयातील यातही महिला यांची संख्या जास्त अनेक वर्षांपासून गुण्या-गोविंदाने राहत असलेल्या या वृद्धाश्रमात 4 ते 5 महिन्यापासून एका महिलेच्या अंथरूणात तिखट, लिंबूला सुया टोचलेले तर कधी पूजा साहित्य पडत असल्यामुळे सर्वजण घाबरले व त्यांनी मातृसेवा संघाच्या अध्यक्षाकडे तक्रार केली. त्यांनी सर्व प्रकारे समजूत काढून पाहिली मात्र परिणाम झाला नाही. अखेर गजेन्द्र सुरकार यांच्याकडे तक्रार केली.

            या प्रसंगी सुरकार यांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि चमत्काराचे प्रात्यक्षिक दाखवून प्रबोधनातून माहिती देऊन प्रसंगी पोलीस कार्यवाही होईल. तर मातृसेवा संघाच्या व वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा श्रीमती देशमुख यांनी अशा व्यक्तीस जो या भानामती सदृश्य कार्यात सहभागी असेल त्यांना तत्काळ काढून टाकले जाईल अशी समज दिली याचा परिणाम होऊन 4 ते 5 महिन्यापासून होणारे भानामतीचे प्रकरण बंद पडले या प्रसंगी संचालिका सौ.बेंदूर व कार्यकर्तेया कार्यक्रमास हजर होते.

-गजेंद्र सुरकार, वर्धा