Categories
वेचक-वेधक

चंद्रास्वामींना 25 लाखांचा दंड

जुलै - २०११

‘फेमा’ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी स्वयंघोषित गुरू चंद्रास्वामी यांनी आठवडाभरात 25 लाख रूपयांचा दंड भरावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. चंद्रास्वामी यांनी ‘फेमा’ कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याचा ठपका ठेवून सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्याविरोधात अनेक खटले दाखल केले आहेत.

            सुटीकालीन खंडपीठाचे न्या.बी.एस.चौहान व न्या.स्वतंत्रकुमार यांनी हा आदेश जारी केला. चंद्रास्वामी आणि त्यांचे साथीदार विक्रमसिंग यांनी चार व्यवहारांमध्ये ‘फेमा’ तरतुदींचा भंग केल्याचा ठपका ठेवून सक्तवसुली संचालनालयाने त्यांना दंड ठोठावला. हा एकूण दंड नऊ कोटी रूपयांचा आहे.

            चंद्रास्वामी यांच्या वकिलांना यासंबंधी न्यायालयाने विचारणा केली असता आपण या रकमेचा भरणा करू परंतु एकदम संपूर्ण रक्कम भरणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर चंद्रास्वामी यांनी एका आठवड्यात 25 लाख रूपये भरण्याचा आदेश न्यायालयाने दिला आणि पुढील सुनावणी जुलैच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली. चंद्रास्वामीचे अध्यात्मिक सामर्थ्य कुठे पळाले?