Categories
चळवळ पुरस्कार

गजेंद्र सुरकार यांना शासनाचा वनश्री पुरस्कार!

जून – २०११

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार नागपूर विभागातून व्यक्ती संवर्गातून प्रथम पुरस्कार अंनिस कार्यकर्ते गजेंद्र सुरकार यांना मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मिळाला. 25 हजार रूपयांची रोख रक्कम, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी मंचावर मंत्री नितीन राऊत, जलसंधारण रो.ह.यो. हजर होते.

            गजेंद्र सुरकार हे सर्पमित्र म्हणून काम करतात. ते अंनिसचे विदर्भ विभाग प्रमुखही आहेत. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल म.अं.नि.स.च्या वतीने हार्दिक अभिनंदन!