डॉ. निलिमा शिंदे यांची अंनिसला देणगी
सांगली येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायिक डॉ. अजित व डॉ. निलिमा शिंदे-म्हैशाळकर यांनी त्यांच्या श्री.आण्णासाहेब म्हैशाळकर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्यावतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीस रुपये 50,000/- देणगी नुकतीच दिली. डॉ. निलिमा शिंदे या अंनिवाच्या आजीव सभासद आहेत. त्यांनी ही देणगी वार्तापत्रातील समितीचे कार्य वाचून दिली. त्याबद्दल समिती त्यांची अत्यंत आभारी आहे.
अंनिस मित्र-डॉ. पुरुषोत्तम खुटाळे यांचे निधन
सातारा येथील पुरोगामी चळवळतील निष्ठावंत कार्यकर्ते डॉ. पुरुषोत्तम खुटाळे यांचे नुकतेच निधन झाले. डॉ. खुटाळे हे राष्ट्रसेवा दलाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विविध उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. डॉ. खुटाळे यांच्या कुटूंबियांच्या दुःखात मअंनिस सहभागी आहे. डॉ. खुटाळे यांच्या ईच्छेनुसार त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे सुपुत्र शिरीष खुटाळे यांनी काही सामाजिक संस्थांना आर्थिक मदत केली. त्यांनी अंनिसला रुपये 25,000/- देणगी नुकतीच दिली. शिरीष खुटाळे यांचे आम्ही कृतज्ञ आहोत.
डॉ.कांकरिया यांची विद्यापीठाच्या छाननी समितीवर निवड
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पिंपरी चिंचवड शाखेचे सक्रीय कार्यकर्ते प्रा. डॉ. राजेंद्र कांकरिया यांची विद्यापीठ परिनियम व अध्यादेश यांच्या छाननी समितीवर सदस्य-सचिव म्हणून नियुक्ती नुकतीच महाराष्ट्र शासनाने केली. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार राज्यातील अकृषी विद्यापीठाकडून प्राप्त होणार्या अध्यादेशांना मान्यता देण्यापूर्वी त्याची तपासणी व छाननी करुन त्याबाबत शासनास शिफारस करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने एक छाननी समिती गठीत केली आहे. प्राचार्य राजेंद्र कांकरिया यांचे अंनिसतर्फे जाहीर अभिनंदन.
अॅड. गोविंद पाटील यांची सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
सोलापूर जिल्ह्यातील अंनिसचे सक्रीय कार्यकर्ते अॅड. गोविंद पाटील (मोहोळ) यांची सोलापूर जिल्हा बार असोसिएशन या वकिलांच्या संघटनेच्या अध्यक्षपदी नुकतीच बहुमतांनी निवड झाली. त्याबद्दल मअंनिसतर्फे त्यांचे अभिनंदन.
वर्गणीदार वाढवा अभियानास उत्तम प्रतिसाद
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वर्गणीदार वाढविण्याचे जाहीर आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून औरंगाबाद येथील अंनिसचे सक्रीय कार्यकर्ते डॉ. मंगल धारवाडकर यांनी तीनशे पन्नास वर्गणीदार नोंदवून आपला सक्रीय सहभाग दिला. त्याबद्दल डॉ. धारवाडकरांचे हार्दिक आभार!
तसेच वर्गणीदार वाढवा या अभियानामध्ये प्रदीप महाडेश्वर, (अलिबाग) व्ही. आर. गायकवाड (करमाळा) गणेश चिंचोले (मुंबई), डी. बी. राचमाळे (कंधार जि. नांदेड), वाघेश साळुंखे (विटा), पी.एम. जाधव (चंद्रपूर), गजेंद्र सुरकार (वर्धा), चंद्रकात उळेकर (तुळजापुर), अशोक खिलारी (राहूरी), मंगल थोरात (कराड) यांनी अंनिवाचे वर्गणीदार वाढवून चळवळीत सक्रीय सहभाग दिल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार.