Categories
शाखा वार्ता

लातूर शाखा आंतरजातीय सत्यशोधक विवाहात अग्रेसर

जुलै - २०१३

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. त्यापैकी समिती सत्यशोधकी विवाहास सुद्धा चालना देते. महाराष्ट्रातील काही शाखावर सत्यशोधकी विवाह खूप मोठ्या प्रमाणात लावण्यात शाखा यशस्वी होत आहेत. समिती सत्यशोधकी विवाह, आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह व सत्यशोधकी सजातीय विवाह लावून देते.

            दि. 6 मे 2013 रोजी लातूर येथे वर अमोल महादेव जमादार व वधू भाग्यश्री कल्याण केंद्रे यांचा सत्यशोधकी विवाह लावण्यात आला. या विवाहाची भूमिका, प्रास्ताविक व पुरोहितपण माधव बावगे यांनी केले. वराचे पालक आई वडील उपस्थित होते. तर वधुचे पालकत्व म्हणून मराठवाडा यांत्रिकी कामगार नेते(सरचिटणीस) सौ. व श्री.ज.रा.पोतदार यांनी स्वीकारले. वराचा परिचय प्रकाश घादगिने तर वधुचा परिचय आर.आर.पाटील यांनी करून दिला. सुभाष चिकटे व सूर्यकांत वैद्य यांनी वधुवरास शपथ दिली. लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक चिंचोले व रिपाई कार्यकर्तेप्रा.अनंत लांडगे यांनी वधु वरास प्रमाणपत्र दिले. पुरोहिताचे प्रमाणपत्र माधव बावगे यांनी दिले. सुगंधी फुलांच्या पाकळ्यांची उधळण व महापुरूषाच्या जय घोषात लग्न समारंभ पार पडला. मनोगतात अगोदर वधू वरांनी व नंतर राज्य कर्मचारी संघटनेचे लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष वि.भा.शेटकार यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार अशोक चिंचोले, प्रकाश घादगिने, कामगार नेते ज.रा.पोतदार यांच्या मनोगतानंतर वैजनाथ कोरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप आरळीकर यांनी केले.विविध संघटनेचे कार्यकर्ते, मान्यवर अंनिस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-प्रकाश घादगिने, लातूर.