Categories
सत्यशोधक विवाह

लातूर येथे सत्यशोधकी विवाह

ऑगस्ट - २०११

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा लातूरच्या वतीने दि.9/6/2011 रोजी हॉटेल अंजनी, शिवाजी चौक, लातूर येथे सत्यशोधकी विवाह संपन्न झाला. हा विवाह लातूर शाखेचा 75 वा सत्यशोधकी विवाह. वर-एकुरगे बजरंग भिमराव, वधू-राखेवार मंगल विठ्ठलराव होते.  सत्यशोधकी आंतरजातीय विवाहाचे प्रास्ताविक व भूमिका माधव बावगे यांनी करून दिली. वधुला शपथ प्रा.श्याम आगळे सरांनी तर वराला शपथ प्राचार्य शिवाजीराव माडे यांनी करून दिली. उपस्थितांना पुष्प वाटपानंतर महात्मा फुले लिखीत मंगलाष्टका झाल्यानंतर वधुवरांनी एकमेकांस पुष्पहार अर्पण केला. ज्येष्ठ नागरिक वासुदेवराव बेबळकर व अ‍ॅड.मनोहरराव गोमारे यांच्या हस्ते वधुवरांना विवाहाचे समितीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या विवाहास लातूर मधील मान्यवर व्यक्ती, पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते, अंनिस कार्यकर्ते, बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. विवाहाचे पुरोहित म्हणून माधव बावगे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रकाश घादगिने यांनी केले. तर आभार प्रदर्शन वैजनाथ कोरे यांनी केले.        

-प्रकाश घादगिने, लातूर