महाराष्ट्रातील देवस्थानांच्या ठिकाणी मानसोपचाराच्या अंगाने केली जाणारी बुवाबाजीची माहिती आम्हाला पाठवावी असे आवाहन करीत आहोत.
समाजाच्या ‘निरामय मानसिक आरोग्य’ संवर्धनासाठी लोकांना प्रबोधित करण्याची आवश्यकता आम्हाला वाटते. त्यासाठी अंधश्रद्धा मानल्या जाणार्या मानसिक आजारांबद्दलची माहिती देण्याचे आणि त्यांना शास्त्रीय उपचारांना प्रवृत्त करण्याचे काम महाराष्ट्र अंनिस कार्यकर्ते छोट्या प्रमाणात करीत असतात. भविष्यात त्यासाठीची सर्वसमावेशक मोहीम देखील आम्ही चालवू इच्छितो आहोत. त्यासाठी आजच्या महाराष्ट्रात सर्व धर्मांच्या देवस्थानांच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या आजारांवरील उपचारांचे दावे केले जात असतात. त्याला बळी पडून अनेक अगतिक रूग्ण व त्यांचे कुटुंबीय लुबाडले जातात. त्याबाबतची माहिती संकलित करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याला वाचक, हिंतचिंतक, कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील अशा प्रकारच्या ठिकाणची इत्यंभूत माहिती वार्तापत्राकडे पाठवून सहकार्य करावे, अशी विनंती आहे.