Categories
पुरस्कार

रमेश माने यांचा राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊटर पुरस्कार

जून – २०११

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुरूड (जि.लातूर) शाखेचे कार्यवाहक रमेश दौलतराव माने यांना महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड संस्था मुंबई मार्फत राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊट पुरस्कार देण्यात आला. दि.6 मार्च 2011 रोजी शिवाजी पार्क दादर येथे महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर हे होते. तर राज्य मुख्य आयुक्त भा.ई.नगराळे (आय.ए.एस.निवृत्त) हे उपस्थित होते.