सत्यसाईबाबा यांच्या पुट्टपर्थी येथील आश्रमातील एक खोली उघडण्यात आल्यानंतर त्यात 98 किलो सोने, 317 किलो चांदी आणि 11 कोटी 56 लाख रूपयांची रोख रक्कम मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. नोटा मोजण्यासाठी सुरवात झाली त्यासाठी तीन मशीन्सचा वापर करण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन असून ही सर्व रक्कम पाच जीपमधून स्टेट बँकेत भरण्यासाठी नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. रक्कम मोजण्यासाठी 36 तास लागल्याचे स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटले आहे. यासंबंधात सत्यसाईबाबांच्या आश्रमाच्या विश्वस्तांकडून लवकरच अधिकृत निवेदन केले जाणार आहे. आश्रमाच्या परिसरातील यजूर मंदिर या खोलीमध्ये ही सारी मालमत्ता आढळून आली. 24 एप्रिल रोजी सत्यसाईबाबा यांचे निधन झाले. त्या आधी ते मार्च अखेरीस आजारी पडले तेव्हापासून ही खोली बंद होती. सत्यसाईबाबा यांच्या ट्रस्टच्या सदस्यांनी व त्यांचे वैयक्तिक सहाय्यक सत्यजीत यांनी ही खोली उघडली. ही खोली उघडताना पोलिसांनाही तेथे उपस्थित राहू द्यावे, अशी स्थानिकांची विनंती या सदस्यांनी मान्य केली नाही, असे बोलले जाते. तर यावेळी सोन्याच्या चपलाही मिळाल्याचे वृत्त आहे.
आश्रमात सोने, चांदी तसेच हिर्यांचे असंख्य दागिनेही मिळाले असून याबाबत प्राप्तीकर अधिकारी मूल्यमापन करणार असल्याचे समजते. असा खजिना बाळगणे हे संतपणाचे लक्षण आहे?