हिना कौसर खान-पिंजार यांनी लोकमत तसेच युनिक फीचर्स अँड न्यूज येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. प्रामुख्याने मुस्लिम महिला हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘साप्ताहिक साधना’च्या वतीने त्यांना २०१० तसेच २०१६ मध्ये संशोधन छात्रवृत्ती मिळाली होती. याअंतर्गत त्यांनी घटस्फोटित मुस्लिम महिलांच्या जगण्याचा अभ्यास केला होता.
२०१३ मध्ये त्यांना आदर्श मित्रमंडळाचा उत्कृष्ट महिला पत्रकार हा पुरस्कार मिळाला आहे. २०१४ मध्ये अखिल म्हसोबा उत्सव ट्रस्ट मंडई, पुणे यांच्या वतीने युवा पत्रकारिता भूषण पुरस्कार मिळाला होता.
- भूमिका - लेखन
-
मुस्लिम स्त्रियांच्या जगण्याचा कोलाज
- भूमिका - लेखन
-
सफाई कामगार बनला विज्ञान खेळण्याचा शिक्षक