‘विवेकवादी विचार समाजात रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज आहे. विवेकी विचारांचे शिक्षण आणि कृतिशील पुढाकाराने हे शक्य आहे, असे मत ‘अंनिस’चे कार्यकर्ते राजीव देशपांडे यांनी व्यक्त केले.
‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांना तसेच वाचक व कौटुंबिक मेळाव्यात ते बोलत होते. विश्वास सायनाकर अध्यक्षस्थानी होते. बालचित्रकार प्रशिक एकनाथ पाटील, प्रा. डॉ. प्रमोद दुर्गा, तबलावादक सुनील जाधव यांचा विशेष सत्कार झाला. राज्य प्रधान सचिव माधव बावगे, प्रशांत पोतदार, ‘अंनिवा’चे संपादक प. रा. आर्डे, राहुल थोरात प्रमुख उपस्थित होते.
प्रा. सायनाकर म्हणाले, ‘अंनिस चळवळीत युवकांची संख्या वाढायला हवी. विवेकाच्या विचारांची पेरणी शालेय वयापासूनच झाल्यास सामाजिक विकास होईल. कार्यकर्ते व कुटुंबियांचा मेळावा चळवळीला बळ देणारा आहे, असे मेळावे वारंवार व्हावेत.’ संजय बनसोडे यांनी मेळाव्याची भूमिका स्पष्ट केली. यावेळी माधव बावगे, प. रा. आर्डे, प्रशांत पोतदार, सुरेश शहा, टी. आर. नेर्लेकर, प्रकाश कांबळे, डॉ. दिलीप सावंत, प्रा. सतीश चौगुले, बी. आर. जाधव, वनिता बनसोडे, सागर सूर्यवंशी, सुयश तोष्णीवाल, अजय काळे, अर्पिता बच्चे, प्रा. विष्णू होनमोरे, अजय भालकर, डॉ. नितीन शिंदे, नीलेश कुडाळकर, प्रा. एकनाथ पाटील, विक्रम मोहिते, श्वेता नागणे आदी उपस्थित होते.