रोटरी क्लबचे अध्यक्ष मा.उत्तम कृपलानी यांच्या विनंती नुसार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा वर्धा व विदर्भ सर्प मित्र मंडळ यांच्या सहकार्याने राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार यांच्या पुढाकाराने 51 गावांत जाऊन अंधश्रद्धा निर्मूलन, चमत्काराचे प्रात्यक्षिक, सर्पविज्ञान, स्त्रीभ्रूण हत्या, व्यसनमुक्ती, पर्यावरण, आरोग्य, वन्यजीव या विषयांना घेऊन प्रबोधन करण्याचे ठरले. दि.30 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत साठोडा या गावातून त्याची सुरवात झाली. यावेळी मा.मुलचंदजी जैन, मा.मुरलीधर बेलखोडे, रोटरीचे अध्यक्ष उत्तम कृपलानी, अंनिसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सिद्धार्थ बुटले, सारिका डेहनकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गजेंद्र सुरकार यांनी प्रबोधनपर कार्यक्रम केला. या यात्रेसाठी वरील विषयाच्या अनुषंगाने मारूती व्हॅनवर पोस्टर(चित्रासहित) लावण्यात आली तर त्यामध्ये साऊंड सर्व्हीस, बॅटरी, लाईट, बिछायत अशी सुसज्ज व्यवस्था ठेवण्यात येऊन गावात कार्यक्रम करण्याचे ठरले. त्यानुसार दि.11-5-2012 पर्यंत साठोडा, इंजापूर, ब्राह्मणी, किन्ही, करंजी, काजी या गावांत जाऊन प्रबोधन करण्यात आले.
तर या प्रबोधन मोहिमेची संपूर्ण धुरा राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार सांभाळत आहेत. या मोहिमेत श्रेया गोडे ही तरूणी, सुरज तिरपुडे, अक्षय पाटील हे सर्पमित्र तर अनंत पवार हे रोटरीचे सेवक, अनिल तिमांडे हा कार्यकर्ता यांनी परिश्रम घेतले.
–गजेंद्र सुरकार, वर्धा