“फटाकेमुक्त दिवाळी, निरोगी दिवाळी’ या अभियानाची सुरवात पालघर शाखेने 2006 पासून केली व मध्यवर्तीच्या पुढाकाराने मागील वर्षी 26 शाखांनी या अभियानात भाग घेतला. व सगळ्यांच्या प्रयत्नाने पूर्ण महाराष्ट्रात 15 कोटी रूपयांच्या बचतीचा संकल्प साध्य झाला.
या अभियानाचे नियोजन खालीलप्रमाणे करावे.
1) या अभियानाची तयारी दिवाळीच्या किमान 1 महिना अगोदर करावी. अभियानाला होणार्या खर्चाचा अंदाज घ्यावा. व त्यानुसार आपल्या विभागातील लायन्स क्लब, रोटरी क्लब किंवा स्वयंसेवी संघटनांचे सहकार्य घ्यावे.
2) फटाक्याच्या दुष्परिणामाची माहिती देणारी आकर्षक पत्रके छापणे(1000 प्रतींना 400 रूपये खर्च येतो). शहरातील मुख्य ठिकाणी लावण्यासाठी पोस्टर तयार करणे.
3) शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे, या प्रबोधनात ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, बाल मजुरी, फटाक्यामुळे होणारे अपघात व पर्यावरणाचा होणारा र्हास या मुद्द्यांवर भर द्यावा. आणि विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेणे.
4) शाळेतील हरित सेनेच्या सहकार्याने हे अभियान राबविणे.
5) ‘फटाकेमुक्त दिवाळी’ या विषयावर निबंध, चित्रकला, वक्तृत्व किंवा किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करावी. भाग घेणार्या विद्यार्थ्यांना समितीची पुस्तके भेट द्यावी.
6) विद्यार्थ्यांना फटाक्याचे पैसे वाचवून ते पैसे शाळेतील वाचनालय किंवा गरजू विद्यार्थी फंडात जमा करण्याचे आवाहन करावे, त्यास चांगला प्रतिसाद लाभतो.
7) शहरात ठिक-ठिकाणी रॅलीचे आयोजन करावे. फटाक्याच्या दुष्परिणामाचे स्लाईड-शोचे आयोजन करावे.
8) प्रदुषणाला आळा घालण्यासाठी स्थानिक पोलिसांना व प्रदूषण नियंत्रण मंडळांना पत्र लिहून त्यांचे सहकार्य घ्यावे.
या अभियानाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, पत्रके, संकल्पपत्र तसेच पोस्टरचे नमुने हवे असल्यास खालील नंबरवर संपर्क करणे.
अनिल करवीर – 9823280327,
ई मेल – karvir_ind@yahoo.co.in
अण्णा कडलास्कर – 9270020621