डॉ. जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार

विख्यात खगोल वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. नारळीकर यांनी विज्ञान संशोधनाबरोबरच विज्ञान लोकप्रिय करण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या विज्ञानकथा खूपच लोकप्रिय झाल्या आहेत.
डॉ.नारळीकर यांना महाराष्ट्र अंनिसच्या कार्याबद्दल आस्था होती. ज्योतिषाच्या चाचणीत अंनिसला त्यांनी खूपच सहकार्य केले होते. ज्योतिष हे खगोल विज्ञानाच्या ज्ञानापुढे टिकत नाही या विषयावर महाराष्ट्रभर त्यांनी आपले विचार व्याख्यानाद्वारे मांडले होते. त्यांना मिळालेल्या एका पुरस्काराची रक्कम रू.५ लाख त्यांनी अंनिसला देणगी म्हणून दिली. अशा आमच्या चळवळीच्या मित्राला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले याबद्दल अंनिस परिवार डॉ. नारळीकरांचे हार्दिक अभिनंदन करीत आहे.
प्रा. सदानंद मोरे साहित्य संमेलन अध्यक्ष

प्रख्यात तत्वचिंतक आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची घुमान (पंजाब) येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. डॉ.सदानंद मोरे यांनी जादूटोणा विरोधी कायदा व्हावा यासाठी महाराष्ट्र अंनिसला भक्कम पाठींबा दिला. वारकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या सनातनी मंडळींचा खंबीर प्रतिवाद करून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संताचा वारसा वारकऱ्यांनीच पुढे न्यायला हवा अशी आग्रही भूमिका मांडली.
आमच्या चळवळीचा मित्र व मार्गदर्शक असे डॉ. सदानंद मोरे यांना मिळालेल्या अध्यक्षपदाच्या बहुमानाबद्दल अंनिस परिवार आनंद व्यक्त करीत आहे व त्यांचे जाहीर अभिनंदन करीत आहे.
–संपादक