अंनिसचे टोकाप्रवरासंगम(जि.नगर)चे कार्यकर्ते बी.के.चव्हाण यांचा 53 वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. वाढदिवसानिमित्त टोकाप्रवरासंगम मेडिकल असोसिएशन मार्फत सर्व रोग निदान शिबीर खेडलेकाजळी(जि.नगर) येथे आयोजित केले होते. त्याचे उद्घाटन औरंगाबादचे प्रसिद्ध डॉ.अशोक रेड्डी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मिलिंद देशपांडे उपस्थित होते. या शिबिरात 173 रूग्णांनी स्वत:ची तपासणी करून घेतली. शिबिराच्या ठिकाणी रक्त, लघवी तपासणी, मूळव्याधीवर उपचार, कार्डिओग्राम इत्यादी सुविधा उपलब्ध होत्या. सिप्ला कंपनीने मोफत गोळ्यांचे वाटप केले.
डॉ.अशोक रेड्डी यांनी 60 वर्षांवरील व्यक्तींची मोफत तपासणी करण्याचे आश्वासन दिले. तर अध्यक्ष मिलिंद देशपांडे यांनी रूग्णांना 50 ते 100 टक्के सवलत देत असल्याचे सांगितले. शिबीर व्यवस्थित पार पाडण्यासाठी डॉ.कर्जुले, डॉ.आवटी, डॉ.टवाळ, डॉ.संजय चव्हाण यांनी परिश्रम घेतले. त्याचबरोबर गावचे सरपंच गायकवाड व अंनिसचे डॉ.मच्छिंद्र वाघ यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंबादास कोरडे, पोपट मुट्टे, नामदेव होदे, भास्कर एकबोटे, महादेव मुळे, बाबासाहेब कराळ, अण्णा मुळे, स्वागत चव्हाण, आशा चव्हाण, खोडोबा शिरसाठ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण दुधे यांनी केले व आभार जगन्नाथ कोरडे यांनी मानले.