Categories
सत्यशोधक विवाह

अं.नि.स.शाखा लातूर येथे 67 वा सत्यशोधकी विवाह

एप्रिल - २०११

लातूर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा लातूरच्या वतीने नुकताच एक आंतरजातीय सत्यशोधकी विवाह संपन्न झाला. दिनांक 7/2/2011 रोजी गंगाराम खानापूरकर यांच्या निवासस्थानी हा विवाह संपन्न झाला. वर वेदप्रकाश निंबाळकर व वधू डॉ.स्वाती हरंगुळे या लग्नाची भूमिका, प्रास्ताविक व पुरोहित म्हणून माधव बावगे यांनी कार्य पार पाडले, वराचा परिचय हर्षद मुंगे, तर वधुचा परिचय चिमा कांबळे हिने करून दिला. वधुचे पालकत्व श्री व सौ आरळीकर यांनी स्वीकारले तर वराचे माता पिता अर्थात श्री व सौ. निंबाळकर उपस्थित होते. वरास शपथ अ‍ॅड.मनोहरराव गोमारे यांनी दिली तर वधूस शपथ सौ.खानापूरकर यांनी दिली. या प्रसंगी अंनिस कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

-प्रकाश घादगिने, लातूर