Categories
परिषद

जादूटोणा विरोधी कायदा : स्वागत व अंमलबजावणी परिषद

जानेवारी - २०१४

महाराष्ट्रातील अघोरी, अमानुष व अनिष्ट प्रथांच्या निर्मूलनासाठी राज्यसरकारने उचललेले जादूटोणा विरोधी कायद्याचे पाऊल संपूर्ण भारत देशाला दिशादर्शक ठरणार आहे. त्यामुळे कायद्याच्या प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणीसाठी ‘जादूटोणा विरोधी कायदा : स्वागत व अंमलबजावणी परिषद’ आम्ही आयोजित करू इच्छितो. या दिवसभर चालणार्‍या राज्यस्तरीय परिषदेत आपण सहभागी व्हावे हे आग्रहाचे निमंत्रण आहे.

जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातील जनमानस प्रबोधित करणे, कायद्याविषयीचे प्रचार साहित्य तयार करून मोठ्या प्रमाणात वितरीत करणे, कायदा अंमलबजावणीचे प्रशिक्षण आयोजित करणे आणि अमानुष-अघोरी-अनिष्ट प्रथांच्या निर्मूलनासाठी कायद्याचा अधिकाधिक उपयोग करणे यासाठी महाराष्ट्र अंनिस कटिबद्ध आाहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील जादूटोणा विरोधी कायद्याशी संबंधित विविध मंत्रालयांच्या पुढाकाराने वरील उल्लेखित कृतिकार्यक्रमाबद्दल भूमिका घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटते. त्याबद्दलचा महाराष्ट्र अंनिसने ठरविलेल्या जिल्हानिहाय प्रचार व प्रशिक्षण मोहिमेची सुरूवात आम्ही करू इच्छितो.

राज्यव्यापी परिषद शक्यतो मुंबईत, फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यातील रविवारी आयोजित करणे अपेक्षित आहे.

आपले विनीत,

अध्यक्ष – डॉ.एन.डी.पाटील

राज्यकायार्र्ध्यक्ष – अविनाश पाटील

राज्य प्रधान सचिव – माधव बावगे, सुशिला मुंडे, मिलिंद देशमुख

आणि सर्व राज्य कार्यकारणी.