कोल्हापूर येथील जोतीराम बिरजे यांचा सत्यशोधकी विवाह उज्ज्वला कंदले यांच्याशी संपन्न झाला. या विवाहासाठी ज्येष्ठ विचारवंत आ.ह.साळुंखे, डॉ.अनुराधा गुरव, शहाजी देसाई, जयश्री चव्हाण, अं.नि.स.चे गिरीश फोंडे, उमेश सूर्यवंशी, आर.,एस.कुलकर्णी, रमेश वडणगेकर, के.डी.खुर्द इत्यादीजण उपस्थित होते. तांदळाऐवजी फुलांच्या पाकळ्या अक्षता म्हणून उधळण्यात आल्या. यावेळी सत्यशोधक विवाहपद्धतीची माहिती देणारी पुस्तिका मोफत सर्वांना वाटण्यात आली. अंनिस कोल्हापूर, नौजवान सभा, मराठा सेवा संघ या संस्थांना यावेळी देणगी देण्यात आली.
– अनिल चव्हाण, कोल्हापूर