Categories
चिकित्सा

मला भूत भेटलेच नाही

जून – २०१५

लहानपणापासून माझ्या अवतीभोवती अंधश्रद्धेचेच वातावरण होते. त्या प्रभावातून मोठा झाल्यावर अंधश्रद्धेविरूद्धची व्याख्याने, भाषणे ऐकल्यावर मात्र भूतपिशाच्च, अंगात येणे, भानामती हे सर्व थोतांड आहे हे मनोमन पटले. शिवाय माझ्या आयुष्यात खालीलप्रमाणे काही प्रसंग असे घडले की, या सर्व कल्पित गोष्टी आहेत, याची खात्रीच पटली.

पहिला प्रसंग मी महाविद्यालयीन विद्यार्थी होतो तेव्हाचा. तुळजापूरहून बार्शीस येत असताना बार्शी तीन-चार कि.मी.राहिले असता माझी सायकल पंक्चर झाली. चालत निघालो. बार्शीत प्रवेश करतेवेळी लिंगायत स्मशानभूमी आहे. तिथे येईपर्यंत रात्रीचे दहा वाजले. स्मशानात शिरून हौदावर सायकल लावली. हातपाय धुऊन तेथील कट्ट्यावर बसून भोजन उरकले. त्यावेळी साहजिकच मनात भूतपिशाच्चाच्या अस्तित्वाबद्दल विचार येत होते. आजूबाजूला मृतांची थडगी होती. पण एवढ्या वेळात मला एकही भूत दिसले नाही.

सातारच्या पश्चिमेस गोंदेमाळ म्हणून ठिकाण आहे. तेथील अख्यायिकेप्रमाणे वर्षातील काही ठराविक तीन दिवसांत गावात भुते, वेताळ यांची वस्ती असते. त्यांच्यापासून धोका असल्याने लोक तेवढे दिवस गावाबाहेर जाऊन वास्तव्य करतात. गाव ओस पडतो. याला ‘गावपळ’ म्हणतात. त्या अंधश्रद्धेविरूद्ध अं.नि.स.च्या चळवळीतील काही सदस्यांबरोबर मीही त्या 3-4 दिवसांत त्या गावात राहिलो. पण भूत, वेताळ भेटले नाही.

सुभाष कळसे, वाई, जि. सातारा.