कर्नाटक राज्यात सध्या मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे पद धोक्यात आलेले आहे. विरोधक काही त्यांना शांत बसू देत नाहीत. यावर येडीयुरप्पांनी योग्य तो मार्ग काढावा. अशी अपेक्षा असताना ते सध्या अंधश्रद्धेच्या आहारी गेले आहेत. त्यांच्या गुरू महाराजांनी सांगितल्यानुसार ते त्यांच्यावर आलेले संकट म्हणजे काळीजादू अथवा करणी आपल्यावर केली आहे असे समजत आहेत. विरोधक स्वत: सत्तेवर येण्यासाठी आपल्यावर जादूटोणा करत असून यातून आपण स्वत:ची सुटका करून घेऊ असे त्यांचे म्हणणे आहे. यावर त्यांच्या महाराजांनी त्यांना जे उपाय सांगितले आहे ते भन्नाटच होते.
31 जानेवारी ते 2 फेबु्रवारी सोमवार ते बुधवारपर्यंत फरशीवर विवस्त्रावस्थेत(दिगंबर) झोपावे. याशिवाय पुढील आठवड्यात त्यांच्या घरापासून जवळ असलेल्या नदीत आंघोळीला विवस्त्रावस्थेत जाऊन तेथे सूर्यनमस्कार करावे. असे करणीवर उपाय सांगितले असून येडीयुरप्पा त्याचे पालन करताहेत.
-विश्वजीत चौधरी, जळगाव.