Categories
व्यक्तिविशेष

निर्भयी व निगर्वी व्यक्तित्व

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

अंनिस चळवळीबद्दल मला विशेष अशी फारशी माहिती नव्हती मी सर्वसामान्यच होतो. लॉ कॉलेज मध्ये असताना एन.एस.एस.च्या शिबिरात चमत्काराचा कार्यक्रम झाला होता तेव्हा पासून अनिस च्या जवळ येण्यास सुरुवात झाली होती, आपटे प्रशालेत पुण्याची साप्ताहिक मिटिंग व्हायची, त्या मिटिंगच्या वेळी गिरमे, नानावटी, खिलारे, यांच्यात वैचारिक भांडणे व्हायची मिटिंग संपल्यावर कळायचे ती वैचारिक चर्चा असायची, तो पर्यंत दाभोलकर नावाच्या माणसाला मी पाहिलेच नव्हते पण सगळ्यांच्या तोंडी त्यांचे नाव असायचे बरेच जण म्हणायची खूप मोठा माणूस आहे, महाराष्ट्रात सगळीकडे बसने प्रवास करतात घरच्यांना देखील माहित नसते ते कोणत्या गावाला असतात मला खूप कुतूहल वाटायचे आणि एका दिवशी चिंचवडला बी.प्रेमानंद यांचा कार्यक्रम चिंचवडला कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात मी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर पाहिले. मला एक साधा माणूस असल्या सारखेच वाटले माझा मनात ज्या मोठ्या माणसाविषयीच्या कल्पना होत्या त्याला कात्रीच लागली! त्या दिवशी कळले साधी राहणी उच्च विचार दाभोलकर साधनेचे संपादक नसते तर मला साने गुरुजीचे काय आहे हे पण कळले नसते ते साधनेत असायचे त्यावेळी त्यांच्या केबिन मध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करावयास मिळायची लगेच ते त्यांच्या जवळ असलेली केळी द्यायचे किंवा लगेच चहा मागवायचे त्यांच्या बरोबर सुरुवातीला खूप संकोचल्या सारखे व्हायचे। माझ्या कुटुंबातून कोणताच वैचारिक वारसा मला मिळाला नाही, आमचे कुटुंब सनातनी पण नव्हते. पुरोगामी पण नव्हते. विचार काय असतात हे कळलेच नाही. पण दाभोलकरांच्या जवळ गेल्यामुळे वैज्ञानिक दुष्टीकोनाचा वारसा मला मिळाला आणि तो मला आयुष्य भर पुरणार आहे .

अंनिस चळवळीला 10 वर्षे पूर्ण झाले होते. 2000 साली दशपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच महाराष्ट्रात अंनिसचे अधिवेशन पुण्यात भरले होते त्या वेळी स्थानिक कार्यकर्ता म्हणून माझ्यावरदेखील जबाबदारी होती मला पडद्यामागची कामे माझ्या कडे होती, कोणत्याही कामाची लाज वाटता कामा नये याची शिकवण देखील दाभोलकरांमुळे मिळाली दाभोलकर स्वतः अधिवेशनातील संतरजी उचलायचे, खुर्च्या उचलायचे, कुठलाही अभिमान नसायचा. या सगळ्याचा उपयोग हा विज्ञानबोध वाहिनीच्या कार्यक्रमात झाला, ज्या खोलीमध्ये दाभोलकरांची पुस्तकांची थैली होती त्या ठिकाणी ऑफिस कामाची जवाबदारी माझ्यावर होती मी त्यांच्या त्या थैलीत अनेक नवीन पुस्तकांचा संच पहिला मला कुतूहल होते पुस्तकांचे. मला रहावले नाही. मी त्यातली काही पुस्तके माझ्या पिशवीत टाकली त्यात दाभोलकरांचे ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा’, ‘प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ ही पुस्तके वाचली आणि त्या दिवसापासून दाभोलकरांचा खर्‍या अर्थाने मी साथी झालो त्यांचा सहवासात राहण्याचा एक वेगळाच आनंद मिळायचा. नवीन गोष्टी समजायच्या. त्यांच्यामुळेच मला महाराष्ट्र पहावयास मिळाला. भारतीय स्वातंत्र्य चळवळी व त्या वेळच्या आंदोलनाविषयी पुस्तकातून समजत होती पण प्रत्यक्ष त्यासारखा अनुभव डॉक्टरांमुळे, शनी शिंगणापूर आंदोलनात, बुवाबाजी संघर्ष यात्रा, मुंबईत दरवर्षी होणारी कायद्याविषयी होणारी धरणे आंदोलने, वेगवेगळ्या होणार्‍या परिषदामध्ये घेता आला यात दाभोलकरांची भाषणे व त्यांचा सहवास मिळाला, दाभोलकर जरी गांधीच्या विचारांचे पुरस्कार करणारे असले तरी मला ते कम्युनिष्ट गांधीच वाटत। त्यांच्या भाषणाच्या वेळी अनेक वेळा विवेक या शब्दाचा वापर होयचा ज्यावेळी ते विवेक शब्द उच्चारायचे त्यावेळी इतर साथी माझ्याकडे पहायचे अजून दाभोलकरांनी विवेकाला सोडले नाही असे हसून म्हणायचे. खरे म्हणजे दाभोलकरांनी विवेक शब्द उच्चारला की मला फार छान वाटायचे त्याच बरोबर विवेकाने वागण्याची मोठी जबाबदारीच वाटायची. पण खरे म्हणजे डॉक्टरांनी त्यांच्या आयुष्यात कधीच विवेक सोडला नाही. बुवाबाजी संघर्ष असू द्या नाहीतर विलंब होणारा कायदा असू द्या डॉक्टरांनी कधीच विवेक सोडला नाही, बुवाबाजी संघर्ष यात्रेत मुंबईत एका कार्यक्रमात डॉक्टर दाभोलकरांचे भाषण सुरु झाले. एका भक्ताने त्यांच्यावर खुर्ची उचलली होती आम्ही मी खूप घाबरलो. मला या गोष्टीचा फारसा अनुभव नव्हता आम्ही डॉक्टर दाभोलकरांनाभोवती कडे करून उभे राहिलो होतो, नंतर काहीच झाले नाही असे दाखवून पुन्हा त्याच जोशामध्ये त्यांनी त्यांचे व्याख्यान पूर्ण केले . कुठे हि मत्सर नाही, राग नाही, भीती तर आजिबात नाही, सगळ्या गोष्टी ते खेळाडू वृतीने घेत याचे नवल वाटे. डॉक्टर दाभोलकरांना कार्यकर्त्यांची काळजी खूप असायची. मला अजूनसुद्धा आठवते विज्ञानबोध वाहिनीच्या दौर्‍याच्या वेळी सारखे कार्यक्रम करून माझा गाल आणि घसा चांगलाच दुखायला लागला होता त्या दुखरा गाल आणि घश्यासह जोशपूर्ण कार्यक्रम चालू होते याची दखल सुद्धा डॉक्टरांनी घेतली. त्यांचा फोन आला होता ते फोन वर बोलले, ‘विवेक औषधे घेतली का खूप त्रास होत असेल तर जास्त कार्यक्रम करू नका. एखादा कार्यक्रम कमी करा, ‘शीर सलामत तो पगडी पच्चास’ याचप्रमाणे घसा सलामत तो कार्यक्रम पच्चास त्यांचा फोन आल्यामुळे वेगळाच हुरूप यायचा. दुखणे पळून जायचे. पुन्हा जोश यायचा. चिपळूणला विज्ञानबोध वाहिनी बरोबर केमिकल कंपनीच्या आमंत्रणानुसार तेथे गेलो होतो पण सनातनी लोकांच्या दबावामुळे कंपनीने त्यांच्या गेस्ट हाउस मधून रात्री 12 वाजता बाहेर पडण्यास सांगितले. बाहेर सनातनी लोक दगा फटका करण्याची भीती होतीच त्या रात्री संजय (टिटवाळा), भास्कर सदाकळे (सांगली) आम्ही चांगल्या पेचात सापडलो. ती कंपनी आमची कुठलीच संरक्षणाची जबाबदारी घेण्यास तयार नव्हती ते आम्हाला त्या रात्री बाहेर निघा म्हणायचे ते सनातनी येऊन तुम्हाला मारतील असे म्हणायचे. डॉक्टरांचा फोन लागला, त्यांनी पोलिसांना फोन केला. त्यांच्या संरक्षणात दापोलीत अनिश पटवर्धन यांच्याकडे सुखरूप पोहचलो. आमची डॉक्टरांना खूप काळजी होती. आमची अनेक प्रसंगातून त्यांनी सुटका केली. डॉक्टर नेहमी कार्यकर्त्यांशी त्यांच्या कुंटुंबियांची विचारपूस करत असत. कधीही भेटल्यावर विवेक कसा आहेस नेहमी विचारायचे त्यांची पाठीवर थाप पडली की एक वेगळाच जोश यायचा.

प्रा. विवेक सांबरे, पुणे