पंढरपूर तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दि.7 जून 2012 रोजी ‘कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर’ घेण्यात आले. यामध्ये प्रमुख उद्घाटक प्राचार्य डॉ.के.एन.गणगे यांनी केले. पूजा-अर्चा, चमत्कार यामुळे माणसाला माणूसपण प्राप्त झाले नसून ते वैज्ञानिक दृष्टिकोन समजल्याने प्राप्त झाले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तसेच जादूटोणाविरोधी कायदाही संमत झाला पाहिजे असे प्रतिपादन डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी केले. दुसर्या सत्रात श्रीमती शालिनीताई ओक यांनी ‘मन व मनाचे आजार’ आणि श्रीमती निशाताई भोसले यांनी ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा’ यावर मार्गदर्शन केले.
प्रशांत पोतदार यांनी ‘चमत्कार सादरीकरणा’मध्ये अनेकविध प्रयोग करून कार्यकर्त्यांना कार्यकारणभाव समजावून सांगितला. काहीतरी चमत्कार करून बुवा लोकांना फसवतात तेही या सादरीकरणातून स्पष्ट केले.
या शिबीरासाठी प्रा.नामदेव शिंदे, सोमनाथ गायकवाड, संतोष साळुंखे, विकास आदीमले, धीरज कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
-सोमनाथ गायकवाड, पंढरपूर, जि. सोलापूर