Categories
सत्यशोधक विवाह

शिराळा तालुक्यात पहिला सत्यशोधकी विवाह

फेब्रुवारी – २०१४

करमाळे(ता.शिराळा, जि.सांगली) येथील समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व इतर समविचारी संघटनांच्या सहकार्याने पत्रकार अमर लक्ष्मण पाटील यांचा दानोळी, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर येथील शुभांगी शिंदे हिच्याशी सत्यशोधक विवाह घडवून आणला. शिराळा तालुक्यातील हा पहिला सत्यशोधक विवाह आहे. ईर्षा, श्रीमंतीचे प्रदर्शन, बँड, ढोल, ताशे, डॉल्बी, घोडा यामुळे विवाहात खर्चही मोठा होई. प्रचंड खर्च आणि कर्ज व्याज, सावकारी यामुळे कुटुंब उद्धवस्त होई. याला फाटा देऊन म.जोतिराव फुले प्रणित सत्यशोधक विवाह करायचा निर्धार अमर पाटील आणि मित्रमंडळीने केला. दोन्ही घरच्या मंडळींनी याला पाठींबा दिला.