महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व तालुका शाखा वर्धातर्फे सेवाग्राम येथे दि 26 मे रोजी 32 वा आंतरधर्मीय विवाह संपन्न झाला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. सचिन ओंबासे सर (सी.ई.ओ. जि. प. वर्धा) मा. विकास राचेलवार (सहायक प्रकल्प अधिकारी, गडचिरोली), मा. गजेंद्र सुरकार(राज्य सरचिटणीस), मा. प्रा. नूतन माळवी (सत्यशोधक महिला प्रबोधिनी) उपस्थित होत्या. महात्मा फुलेंच्या अखंड वाचनाने सुरुवात केली. शपथ प्रकाश कांबळे, भरत कोकावार, भीमसेन गोटे यांनी दिली, तर सूत्रसंचालन मा. सुनील ढाले यांनी केले. या विवाहाचे खास वैशिष्ट्य म्हणजे वर रूपेश नाईक यांनी डॉ नरेंद्र दाभोलकर लिखित ‘विज्ञान, विवेक आणि विद्यार्थी’ या पुस्तकाच्या 1 हजार प्रती उपस्थित लोकांना वितरीत केल्या. नवविवाहितांचे वर्धा शाखेतर्फे खूप-खूप अभिनंदन व सहजीवनाच्या पुढील वाटचालीस सदिच्छा!
Categories