Categories
पुस्तक परिचय

वाचलेच पाहिजे असं!

ऑक्टोबर - २०११

            वार्तापत्राकडे लेखक मित्राकडून परीक्षण व प्रसिद्धीसाठी साहित्य येत असते. त्यांचा परिचय आमच्या वाचकांना करून दिला जावा अशी वार्तापत्राची भूमिका आहे. अशा काही पुस्तकांचा संक्षिप्त परिचय.

1) गाथा उत्क्रांतीची

            मुलांना समजेल असे ‘गाथा उत्क्रांतीची’ हे बालवाङ्मयाचे पुस्तक चार चार ओळीच्या कवितेच्या स्वरूपात अतिशय प्रासादीक भाषेतील विज्ञान मुलांमध्ये प्रिय करील असे हे पुस्तक आहे. प्रत्येक पानावर उत्क्रांतीचे चित्ररूप दर्शन मुलांना आवडेल असेच आहे.

लेखिका : नीलम माणगावे

प्रकाशक : अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर

फोन नं.: 9371815554

किंमत 40 रू.


2) तेजस्विनी

            बहुजनातील कर्तृत्ववान स्त्रियांचा गुणगौरव व परिचय करून देणारा हा ग्रंथ आहे. याचे लेखक प्रा.गौतम निकम हे अंनिस चळवळीत सक्रीय असतात. त्यांची बहुजनांचे प्रबोधन करणारी 13 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘तेजस्विनी’ हे चौदावे पुस्तक आहे.

लेखक : गौतम निकम

प्रकाशन : विकलकिर्ती प्रकाशन, चाळीसगाव

किंमत : रू.70/-


3) नवे सहस्त्रक, नवे तत्वज्ञान, नवा धर्म, विश्वधर्म

            इसवी सनापूर्वीचे तत्वज्ञान व धर्म आज कसा उपयुक्त ठरेल? आज खरी गरज आहे ती विश्वधर्म वा मानवधर्माची. ज्ञानाच्या प्रकाशात जुन्या धर्मकल्पना कशा तपासायच्या याचे मार्गदर्शन या छोटेखानी पुस्तिकेने आपण मिळवू शकाल.

लेखक व प्रकाशक : द्वारकानाथ लेले, पुणे.

किंमत : रू.10 रू.

प. रा. आर्डे