
सध्या देशातील वातावरण अतिशय चिंताजनक आहे. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि इतर विचारवंतांच्या खुनासाठी पकडले गेलेले आरोपी हे कट्टर हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. ‘आमच्या धर्माविरोधी बोललात, तर तुम्हाला संपवून टाकू,’ ही प्रवृत्ती अत्यंत घातक व संविधानविरोधी आहे. आमच्या विचारांच्या विरोधात बोललात, तर तुम्ही देशद्रोही’ सत्ताधारी मंत्री व अनेक नेत्यांची बेताल वक्तव्ये, झुंडशाहीने विशिष्ट लोकांचा करण्यात येणारा खात्मा या सर्व गोष्टी संविधानप्रेमी नागरिकांना आणि पुरोगामी विचारांच्या लोकांना काळजीत टाकणार्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि भारतीय संविधान समर्थक परिवर्तनवादी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 9 सप्टेंबर 2018 रोजी पुणे येथे ‘धार्मिक दहशतवाद व असहिष्णुताविरोधी राज्यस्तरीय संकल्प परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते.
शब्दांकन : देविदास इंगळे, उत्तम जोगदंड, टी. आर. गोराणे
परिसंवाद संकलन : राजीव देशपांडे, राहुल थोरात
या परिषदेत खालील नामवंत विचारवंतांनी आपले परखड विचार स्पष्टपणे मांडले. त्यांच्या भाषणाचा सारांश या परिसंवादात आम्ही प्रसिद्ध करीत आहोत.




