मअंनिस महिला आघाडीच्या अॅड.पूजा जाधव यांच्या पुढाकाराने वर्धा येथे आर्वी नाका परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास स्वामीनाथन फौंडेशनचे किशोर जगताप पोलीस उपाधीक्षक किल्टनेकर, रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन अधिकारी मा.मगर आशा वर्कर प्रमुख इमडवार मॅडम, अंनिसचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांनी मार्गदर्शन केले.
साईनगर येथे मराठा सेवा संघाचे नंदकुमार वानखेडे व जिजाऊ ब्रिगेडच्या अलका वानखेडे यांच्या पुढाकाराने महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ विचारवंत मा.पन्नालालजी सुराणा, राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, सभापती असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
बच्छराज धर्मशाळा येथे मा.वि.म.च्या पुढाकाराने समितीचे बुवाबाजी संघर्ष विभागाचे प्रमुख भरत कोकावार यांनी जिल्हा बचत गटाचा मेळावा आयोजित केला. पूजा जाधव, सारिका डेहनकर, मा.वि.म.च्या जिल्हाप्रमुख सौ.देशमुख मॅडम, चेतना संस्थेच्या सौ.वानखेडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
पुलफैल या सनॅम एरियात शारदाताई झासरे या समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन महिलांचा मेळावा घेतला. यावेळी राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा.नूतन माळवी यांनी मार्गदर्शन केले.
याच मोहिमेदरम्यान वर्धा शहरातील सात आंतरजातीय लग्न करणार्यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करून त्यांचे अनुभव कथन घेण्यात आले. तसेच फातिमा बी.शेख या प्रथम मुस्लिम शिक्षिकेच्या स्मरणार्थ आझाद उर्दू हायस्कूल येथे मुस्लिम समाजातील शिक्षिका असणार्या नाझिम मियाजी यांचा सत्कार व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. व्यसनमुक्ती सप्ताहांतर्गत दोन महाविद्यालयांत व्यसनमुक्ती कार्यक्रम घेण्यात आला, तर चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांच्या 4 शिबिरात व्यसनमुक्तीवर प्रबोधन करण्यात आले.
–गजेंद्र सुरकार, वर्धा.