धर्मानुसार राजकारण व्हावे, धर्मसत्तेचे राज्यसत्तेचे नियंत्रण असले पाहिजे, जेव्हा जेव्हा राज्यसत्ता भ्रष्ट होते तेव्हा तेव्हा धर्मसत्ता तिला ताळ्यावर आणते. अशा पद्धतीची वक्तव्ये सत्ताधार्याकडून तथाकथित धर्ममार्तंडाकडून होत आहेत. सर्वसामान्यांच्या मनात गोंधळ उडवून दिला जात आहे. या संदर्भात विचारवंत, अभ्यासक, कार्यकर्ते यांची काय मते आहेत यादृष्टीने हा परिसंवाद घेतला आहे.
यात प्रा. एन. डी. पाटील यांनी ज्यादिवशी धार्मिक सत्ता राज्यसत्तेच्या वरचढ होईल तेव्हा लोकशाही संपुष्टात येईल व देशाची शकले उडतील असा इशारा दिला आहे. तर डॉ. अशोक चौसाळकरांनी जगातील सर्वच देशातील वाटचाल धर्माच्या प्रभावातून मोकळे होण्याची आहे, असे मानले आहे. जयदेव डोळे यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामागचे ‘मुळ’ सांगितले आहे. डॉ. प्रदीप पाटकर यांनी धर्मसत्ता व राज्यसत्ता एकमेकांच्या आधार आहेत की अंकुश आहेत असा प्रश्न उपस्थित करीत त्याचा उहापोह केला आहे. प्रा. दिपक बोरगावे यांनी धर्मसत्ता व राजकारण, साहित्य संस्कृती, व्यवहार यांची समकालीन उदाहरणे देत चर्चा केली आहे.
धर्मसत्तेचा राज्यसत्तेवर प्रभाव नको – प्रा. एन. डी. पाटील