भारतातील सर्व समाजांच्या समग्र जीवनव्यवहाराला ‘जात’ या प्रकरणाने घट्ट विळखा घातलेला आहे. भांडवशाहीचा झालेला विस्तार, शिक्षणाचा प्रसार, विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभाव वगैरेमुळे ह्या विळख्यातून भारतीय समाजाची सुटका होईल अशी आशा होती. परंतु ही आशा फोल ठरली व हा विळखा थोडाफार सैल झाला तरी संपूर्णपणे सुटला नाही. उलट या आधुनिक भांडवलदारी व्यवस्थेतही जातीव्यवस्थेने आपल्या अस्तित्वासाठी आपला आधुनिक अवकाश निर्माण केलेला आहे व त्यातूनच जातीसंदर्भातील अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आजचे ‘जाती संघटन’ ही त्यातूनच निर्माण झालेले आहे. मग हे जाती संघटन जाती अंताच्या लढ्याला कितपत पोषक आहे की ते मारक आहे; या जातीसंघटना आणि जातीयवादी संघटना यात काय फरक आहे; तसेच आजच्या जातीव्यवस्थेचे स्वरुप काय आहे; याबाबत उहापोह व्हावा या हेतुने अंनिवाच्या वाचकांसाठी हा परिसंवाद आयोजित करीत आहोत.या परिसंवादात सहभागी होत आहेत खालील मान्यवर…
सुभाष थोरात आनंद तेलतुंबडे टी. बी. खिलारे
श्रीराम जाधव महादेव जानकर प्रा. जयदेव डोळे
प्रा. राहूल दळवी राजन खान डॉ. कैलास कमोद
प्रा. वैजनाथ महाजन